Tag Archives | online cheating

matrimonial site cheat

विवाह जुळवणाऱ्या साइटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलेने २३ लाखाला गंडवले

पवईतील कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीशी विवाह जुळवणाऱ्या साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे मैत्री करून, वडिलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे देण्याच्या प्रत्याशावर एका महिलेने २३.४४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराने गेल्या वर्षी लग्न जुळवणाऱ्या साईटवर एका महिलेच्या प्रोफाइला […]

Continue Reading 0
phishing

बक्षिसाच्या आमिषाने एनएसजी कमांडोला गंडा

सरकारी योजनेत बक्षिस लागल्याची बतावणी करून एका एनएसजी कमांडोला तब्बल २.४२ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पवईत समोर आला आहे. या घटनेमुळे सायबर क्राईमचा घेरा वाढत चालल्याने एनएसजी कॅम्पमध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. पवई पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे. उत्तरप्रदेशचा असणारा अजितकुमार पाल हा सैन्यदलात कर्तव्य बजावत […]

Continue Reading 0
fraud

चांदिवलीत सराफाला दहा लाखांचा गंडा

चांदिवली फार्मरोडवरील एका सराफाला १० लाख ४३ हजार रुपयांना एका ठगाने गंडवल्याची घटना घडली आहे. याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून, साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत. रमेश जैन यांचे चांदिवली फार्मरोड परिसरात दागिन्यांचे दुकान आहे. काही दिवसांपुर्वी  दुकानामध्ये एक व्यक्ती दागिने पाहण्यासाठी आला होता. मी खूप दागिने खरेदी करणार असल्याचे सांगत […]

Continue Reading 0
phishing

व्यावसायिकाला ऑनलाईन ५.८ लाखाचा गंडा

पवईमधील हिरानंदानी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाला फिशिंगद्वारे (ऑनलाईन फसवणूक) ५.८ लाखाचा गंडा घातला आहे. जवळचा मित्र असल्याचे भासवून मेलद्वारे पैशाची मागणी करून अनोळखी व्यक्तीने फसवणूक केली असून, याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरु केला आहे. गुन्ह्यात वापरला गेलेला इमेल हा मित्राच्या इमेल अकौंटशी मिळता-जुळता असल्याने किंवा हॅक केला असल्यामुळे सहज […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकन आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर महिलेला गंडा

तीन लोकांच्या टोळीतील एकाला पवई पोलिसांनी केली अटक एक ४८ वर्षीय महिलेशी फेसबुक या सोशलसाईटवर अमेरिकन आर्मीत अधिकारी आहे आणि अफगाणिस्तान येथे पोस्टिंग असल्याचे सांगून, मैत्री करून ३ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला दिल्ली येथून पवई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. रिचर्ड डेविड शेम्री (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, अधिक तपासासाठी त्याला पोलीस […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

सोशल नेटवर्क साईटवर मैत्री करून महिलेला दोन लाखाचा गंडा

पवईतील एका ३४ वर्षीय महिलेशी सोशल नेटवर्किग साईटवर मैत्री करून, भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने १.७३ लाखाचा गंडा घातल्याचे नुकतेच समोर आले आहे. याबाबत पवई पोलिसांनी भादवि आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. गिता पारेख (बदललेले नाव) या पवईतील अशोकनगर भागात आपल्या दोन मुलींसोबत राहतात. त्यांचे पती मर्चंट नेव्हीमध्ये कामाला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!