Tag Archives | Powai Police

hatya

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा दगडाने ठेचून खून, आरोपीला अटक

दारू पिताना दोघांच्यात झालेल्या किरकोळ वादात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. गणेश प्रधान (२८) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, शनिवारी पवई पोलिसांनी त्याचा मित्र संदेश धिंग्रा याला गुन्ह्यात अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या […]

Continue Reading 0
Accident IIT Main Gate

आयआयटीजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण आयआयटी  मेनगेटजवळ काल (शुक्रवारी) रात्री ७.३० वाजता झालेल्या अपघातात एका इसमाला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली. संजय सदानंद मयेकर (४३) असे या मृत इसमाचे नाव आहे. ओल्या रस्त्यावरून मोटारसायकल घसरून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे. पवई पोलीस त्याला चिरडणाऱ्या अज्ञात वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. यासंदर्भात पवई […]

Continue Reading 0
IMG_4058

दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]

Continue Reading 2
bharat band powai

भारत बंदला पवईत संमिश्र प्रतिसाद, पेट्रोलपंप बंद ठेवल्याने वाहनचालकांची कोंडी

@रविराज शिंदे, रमेश कांबळे इंधन दरवाढी विरोधात सोमवारी (१० सप्टेंबर) विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदचे संमिश्र पडसाद पवईतही पहायला मिळाले. येथील कॉग्रेस, मनसे, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेत, निदर्शने करत जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) आयआयटी मेनगेट येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवणेच व्यापाऱ्यांनी पसंद केले होते. […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. […]

Continue Reading 0
rakshabandhan PPS

बंध रेशमाचे, बंधन रक्षणाचे

श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भारतीय संस्कृतीत बहिण आपल्या भावाला आपल्या बंधू प्रेमाचे प्रतिक आणि दीर्घायुष्यासाठी राखी बांधते, तर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पवईतील महिला आणि विद्यार्थिनीनी खऱ्या अर्थाने भावाचे कर्तव्य निभावणाऱ्या आणि केवळ आपल्याच नव्हे तर देशातील प्रत्येक बहिणींच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या वर्दीतील रक्षक पोलीस आणि सैनिक यांना राखी बांधत हा सण […]

Continue Reading 0
प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू

खोट्या कागदपत्रांच्या आधारे लोन काढून मुंबईकरांना लाखोंचा चुना लावणाऱ्या चौघांना पवईत अटक

खोटी कागदपत्रे तयार करून मुंबईकरांच्या नावाने बँकेतून लोन काढून लाखोंचा गंडा घालणाऱ्या चौघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण बस्तानव नरोना, डेरिक बस्तानव नरोना, सेविअर जून नरोना आणि विल्सन अन्थोनी सवेरी मुथू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी आत्तापर्यंत त्यांच्याकडून लोनच्या पैशातून घेतेलेल्या ३ मोटारसायकली, फ्रीज, टीव्ही आणि घरगुती वापराच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंसह […]

Continue Reading 1
car

चोरट्यांनी आयआयटी पवईत हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या १२ लोकांच्या गाड्या फोडल्या

पवईतील आयआयटी येथे हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास १२ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. यावेळी चोरट्यांनी गाडीतील लॅपटॉप, मोबाईल, बॅग अशा मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पवईतील आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये आज (रविवारी) सकाळी हाफ मॅरेथॉन […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!