Tag Archives | Powai

Chandivali BJP Distributed educational materials to 1000 school children on the occasion of PM Narendra Modi's birthday

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चांदिवली येथील १००० शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पखवाडा साजरा होत असताना भाजप मुंबईच्यावतीने चांदिवली येथील झोपडपट्टीतील १००० मुलांना शाळेच्या ड्रेसपासून ते वह्या, पेन्सिल पर्यंतच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. चांदिवली येथील सेठिया नगर हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. ग्रँड मराठा फाऊंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात भाजपा मुंबई अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार, मुंबई सरचिटणीस संजय […]

Continue Reading 0
Python rescued from 5th floor of Powai building

पवईत अजगर चढले ५ माळे; पाऊज मुंबईने केली सुटका

पवईतील रामबाग येथील जलतरंग इमारतीच्या चक्क ५व्या मजल्यावरील घराच्या खिडकीत अजगर पोहचल्याची घटना बुधवार, २१ सप्टेंबर रोजी समोर आली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. अम्मा केअर फाउंडेशन (ACF) आणि प्लांट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी-मुंबई (PAWS-Mumbai) स्वयंसेवक भूषण साळवे आणि धीरज फोडकर यांनी खिडकीतील या ४ फूट लांब अजगराची (इंडियन रॉक पायथन) सुटका […]

Continue Reading 0
Canteen-employee-arrested-for-pepping-after-iit-bombay-student-complained-against-him

पाईपवर चढून डोकावत होता विद्यार्थिनी वसतिगृहाच्या शौचालयात, पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या शौचालयात विद्यार्थिनींचे कथित गुप्त चित्रीकरण केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरलेला असतानाच पवईमध्ये सुद्धा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयआयटी बॉम्बेमधून हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आयआयटी बॉम्बेमधील महीला वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या शौचालयापर्यंत पाईपवरून चढून खिडकीतून डोकावल्याच्या गुन्ह्यात पवई पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या […]

Continue Reading 0
Prashant Sharma Education Excellence Awards

प्रशांत शर्मा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स’

अनेक संस्थांचे विश्वस्त आणि प्रख्यात बांधकाम व्यावसायिक प्रशांत शर्मा यांना शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२२’ प्रदान करण्यात आला आहे. ३ सप्टेंबरला राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. प्रशांत शर्मा यांना हा पुरस्कार त्यांच्याद्वारे चालवल्या जाणार्‍या अनेक संस्थांचे विश्वस्त या नात्याने शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अग्रेसर योगदानासाठी […]

Continue Reading 0
fire at chaitanya nagar powai

पवई चैतन्यनगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग

@प्रतिक कांबळे पवईमधील चैतन्यनगर येथील चाळसदृश परिसरात चाळींच्या घराबाहेर लावलेल्या घरगुती मिटर बॉक्सला आग लागल्याची घटना, गुरुवार १५ सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या मदतीने काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली. अदानी कंपनीचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची तपासणी केल्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे […]

Continue Reading 0
Aditya Thackeray took darshan of Chandivalicha Maharaja0

आदित्य ठाकरेंनी घेतले चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज, गुरुवार ०८ सप्टेंबरला चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत माजी परिवहन मंत्री अनिल परब, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, युवासेना विभाग अधिकारी बालाजी सांगळे आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी संघटना मजबूत करत तिला वाढवण्यासाठी […]

Continue Reading 0
amit shaha am naik school0

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते सोमवारी पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करण्यात आले. शाह यांच्यासमवेत उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपस्थित होते. मंत्र्यांचे स्वागत करताना शाळेचे संस्थापक श्री. नाईक म्हणाले की, “शाळेची स्थापना प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि नवीन पिढीमध्ये राष्ट्रीय […]

Continue Reading 0
IMG_2237

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले हिरानंदानीच्या महाराजाचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरानंदानीच्या महाराजाचे दर्शन घेतले. रिद्धी सिद्धी महिला मंडळाच्यावतीने नवीन हिरानंदानी स्कूल येथील गोपीनाथ मुंडे मैदानात आयोजित गणेशोत्सवास मंगळवारी रात्री भेट देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बाप्पांचे दर्शन घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावर्षी दोन वर्षांनंतर […]

Continue Reading 0
IMG_1330

दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे गुरुवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. परंतु पाठीमागील २ वर्ष कोरोनाच्या संकटामुळे […]

Continue Reading 0
Amalgam, Climate Change competitions hosts by S M Shetty Int’l School

एस एम शेट्टी इंटरनॅशनल स्कूलतर्फे ‘अमलगाम’, हवामान बदल स्पर्धेचे आयोजन

बंट संघाच्या एस एम शेट्टी शैक्षणिक संस्थांच्या वर्षभर चाललेल्या रौप्यमहोत्सवी उत्सवाचा एक भाग म्हणून, इंटरनॅशनल स्कूलने शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी अवर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या आर एन शेट्टी इनडोअर सभागृहात राज्य मंडळ आणि आंतरराष्ट्रीय शाळा यांच्यातील स्पर्धांची मालिका आयोजित केली होती. यावेळी अमलगम नामक हवामान बदल केंद्रीय थीमवर आधारित स्पर्धा होती. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ८ वेगवेगळ्या […]

Continue Reading 0
woman-strangulation

लग्नास टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून

आपल्या प्रियकरासोबत पवईमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. झोरा शाह (३२) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती गेल्या वर्षाभरापासून रमजान शेख या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. तिने आपल्या प्रियकराकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो सातत्यानं टाळाटाळ करत असल्याने महिलेने हे टोकाचे पाऊस उचलले. त्यानंतर […]

Continue Reading 0
IMG-20220822-WA00052.jpg

एटीएम कार्डाची अदलाबदली करून करायचा फसवणूक; पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १३० एटीएम कार्ड जप्त

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तुफेल अहमद लाल मिया सिद्दिकी (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पवई पोलिसांनी त्याच्याकडून विविध बँकांची १३० एटीएम कार्ड सह एक बजाज पल्सर मोटरसाकल हस्तगत केले आहेत. पवईत राहणारा रोशन कुमार […]

Continue Reading 0
aayush foundtion blood donation

पवईत आयुष्य फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी रक्तदान

@अविनाश हजारे पवई येथील आयुष्य फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पवईच्या माता रमाबाई आंबेडकर नगर ग्रुप नं. २ येथील विश्वशांती बुद्ध विहारमध्ये आयोजित केलेल्या शिबिरात तरुणांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या शिबिरात तब्बल २७४ रक्तदात्यांनी रक्तदान करत एक नवा विक्रम केला आहे. दिवंगत […]

Continue Reading 0
WhatsApp Image 2022-08-20 at 4.05.13 PM

आला रे आला गोविंदा आला; पवईत कोरोनामुक्त दहीहंडी

कोरोनाने देशभर थैमान घातल्याने पाठ्मागील दोन वर्ष दहीकाला उत्सवावर असणारे कोरोनाचे सावट पाहता उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मात्र आता कोरोनावर मात करत सर्व सुरळीत झाल्याने प्रशासनाने सर्व निर्बंध हटवले असून, यावर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात दहीकाला उत्सव देशभर साजरा करण्यात आला. मुंबईसह देशभर प्रत्येकवर्षी मोठा आकर्षक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मुंबई, ठाणे येथील […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!