लग्नास टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून

आपल्या प्रियकरासोबत पवईमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. झोरा शाह (३२) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती गेल्या वर्षाभरापासून रमजान शेख या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. तिने आपल्या प्रियकराकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो सातत्यानं टाळाटाळ करत असल्याने महिलेने हे टोकाचे पाऊस उचलले. त्यानंतर आरोपी झोरानं स्वत: पवई पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, झोरा आणि मृत रमजान शेख यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही पवईत लिव्ह-इनमध्ये राहत होते. नात्याला आणखी घट्ट करण्यासाठी झोरा रमजानकडे सतत लग्न करण्याचा हट्ट करत होती, मात्र रमजान नेहमीच काहीतरी कारण पुढे करत टाळाटाळ करत असे. यामुळे काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात बिगाड होत चालला होता.

“लग्नासाठी टाळाटाळ करत असल्यानं दोघांमध्ये अनेकदा कडाक्याचे भांडणं देखील झाले होते,” असे पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “शनिवारी पुन्हा दोघांमध्ये याच मुद्यावरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातच झोराने संतापात ओढणीने रमजानचा गळा आवळून खून केला.”

घटनेनंतर झोराने स्वत: पवई पोलीस ठाण्यात हजर होत याबाबतची माहिती पोलिसांना दिली. परंतु, घटनेचे ठिकाण हे आरे पोलिसांच्या हद्दीत असल्याने या प्रकरणाचा पुढील तपास त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

, , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: