जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर भरधाव वेगात धावणारा एक ट्रेलर आयआयटी पवई येथील मारुती मंदिरामध्ये घुसल्याची घटना (आज) रविवारी रात्री ३.३० वाजता घडली. या घटनेत मंदिराचा मंडपासह परिसरात असणारे एक जुने झाड आणि मूळ गाभाऱ्याची उजव्या बाजूची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. ट्रेलर चालक जमादार मोहम्मद अली (४०) याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. घटना […]
Tag Archives | Powai
पवई, साकिनाका पोलिसांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण
डीजीटायजेशानमुळे वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोखणे आणि अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पवई आणि साकिनाका पोलीस ठाण्याच्या प्रत्येकी ३ अशा सहा अधिकाऱ्यांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबई पोलिसांच्या बांद्रा – कुर्ला (बीकेसी) येथील सायबर सेल विभागात सायबर तज्ञांकडून अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. युनिट १० मधील पवई, साकीनाका सह […]
हिरानंदानीत बांधकाम थांबलेली जागा बनली आजार पसरवणाऱ्या मच्छरांचा उत्पत्तीचा अड्डा
हिरानंदानी गृप दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. स्थानिक नगरसेवक वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर पालिका एस विभाग अधिकाऱ्यांनी आज भेट देवून केली परिस्थितीची पहाणी. हिरानंदानी विकासकाकडून पवई, हिरानंदानी येथील ओडिसी आणि तिवोली इमारतींजवळ सुरु असणाऱ्या एका नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून थांबवण्यात आले असून, येथे जमा झालेल्या घाण पाण्यामुळे आजार […]
युथ पॉवरची आरोग्य सेवा योजना; दरमहा रूग्णालयात करणार मोफत फळे वाटप
पवई | रविराज शिंदे शारीरिक व मानसिक दृष्टिने रोगमुक्त आणि तंदुरुस्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य. प्रत्येक नागरिकांने रोगमुक्त राहवे म्हणून पवईतील नवतरूणांच्या युथ पॉवर या संघटनेने आरोग्य सेवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत संघटनेच्यावतीने गेल्या दोन महिन्यापासून उपनगरातील जवळपास सर्वच सरकारी रूग्णालयात रूग्णांना आरोग्यास हितकारक असणाऱ्या फळांचे वाटप केले जात आहे. भांडूप येथील […]
पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस नायकाला लाच घेताना अटक
रिक्षा चालकाला चरित्र पडताळणीचा दाखला देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्विकारताना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस नाईक संजय बोडके (३५) याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पवईतील तुंगागाव येथील एका तरुणाने रिक्षाचा परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी त्यास चरित्र पडताळणीचा अहवाल सादर करण्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. यासाठी […]
मनुष्यात संचारले जनावर, केला कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचार
आवर्तन पवई | पवई पवई येथील गौतमनगर परिसरात फिरत्या कुत्र्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याच्या गुन्ह्यात जनावर संचारलेल्या एका विकृताला पवई पोलिसांनी काल अटक केली आहे. कुलदीप (१९) असे या तरुणाचे नाव आहे. याच परिसरात ऑगस्ट महिन्यात दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. ज्यानंतर दोन्ही मुलांनी विष घेवून आत्महत्या केली होती. पवईच्या गौतमनगर येथे […]
दिग्दर्शक अभिनेते लेख टंडन यांचे पवई येथील राहत्या घरी निधन
आवर्तन पवई | हिरानंदानी सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि अभिनेते लेख टंडन यांचे आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पवई येथील एसएम शेट्टी शाळेजवळील राहत्या घरी निधन झाले, ते ८८ वर्षाचे होते. उद्या १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. लेख यांनी चित्रपट क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. स्वदेश, रंग दे बसंती, चेन्नई एक्स्प्रेस, आम्रपाली असे […]
शिव-भगतानी रोडला खड्डे; खाजगी रोड असल्याचे सांगत पालिकेचे दुर्लक्ष
आवर्तन पवई | पवई – चांदिवली चांदिवली आणि हिरानंदानी भागाला जोडणारा शोर्टकट रोड शिवभगतानी कॉम्प्लेक्समधून जात आहे. या रोडवरून होणाऱ्या मोठ्या वाहतुकीमुळे येथील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. कॉम्प्लेक्सची निर्मिती करणाऱ्या विकासकाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, रस्ता खाजगी असूूून विकासकाने पालिकेच्या स्वाधिन केला नाही असे सांगून पालिका याच्यातून हात […]
मोदी सरकारच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जन आंदोलन
मोदी सरकारच्या काळात जिवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज संध्याकाळी ५ वाजता विक्रोळी स्टेशन येथे जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजीपाल्यासह गॅसचे व पेट्रोलच्या वाढीव दरामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समर्थक आज रस्त्यावर उतरले होते. गेल्या आठवड्यात एलिफिस्टन रोड येथे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या घटनेतील […]
नगरसेविका वैशाली पाटील यांच्या प्रयत्नातून तिरंदाज पालिका शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरु
तिरंदाज व्हिलेज पालिका शाळेत इमारतीच्या स्लबचे पोपडे निघून पावसाळ्यात पाणी गळती होत होती. तसेच परिसरात शेवाळ तयार झाल्याने मुले घसरून पडण्याची शक्यता वाढली होती. याची दखल घेत स्थानिक नगरसेविका यांच्या प्रयत्नातून शाळा इमारत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये आधीच मुलांची संख्या कमी झाली होती त्यातच […]
स्वच्छ पवई अभियानाचे तिन तेरा, गोखलेनगरजवळ फुटपाथवर फेकला कचरा
कचरा उचलण्याचे काम करणारा जुना कंत्राटदार राजू आम्हाला त्रास देण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करत आहे – श्रीकांत पाटील (भाजप जेष्ठ कार्यकर्ते – वार्ड १२२) पवईमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ पवई अभियान या उपक्रमाला खोडा घालत पवईमध्ये घाण पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गोखलेनगर येथील एका पडक्या […]
पवई तलावात उडी मारून तरूणीची आत्महत्या
रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील रमाबाई आंबेडकरनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय तरूणीने पवई तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी ३ वाजता उघडीस आली आहे. ऐश्वर्या खंडागळे असे तरूणीची नाव असून, ती ज्ञान मंदिर शाळेत १० वीत शिकत होती. शुक्रवारी कोचिंग क्लासला जात आहे असे सांगून गेलेली एश्वर्या उशिरा पर्यंत घरी परतलीच नाही. घरातील […]
बिहटा हत्या प्रकरणातील “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना पवईमध्ये अटक
पटना बिहटा येथील चित्रपटगृह मालक निर्भय सिंघ यांची गोळ्या घालून हत्या करून फरार झालेल्या “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना आज (शनिवारी) पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तुंगा येथून अटक करून पटना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बिहाट, पटना येथील नामांकित व्यक्तिमत्व आणि येथील उदय चित्रमंदिर सिनेमा हॉलचे मालक निर्भय सिंघ यांची चित्रपटगृहाच्या समोर मोटारसायकलवरून आलेल्या काही अज्ञात […]
चांदिवलीतील पवार पब्लिक शाळेतील विद्यार्थ्याचा पडून मृत्यू
गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीत आपल्या मित्रांसोबत खेळत असताना चांदिवलीतील पवार पब्लिक शाळेत पहिलीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पडून मृत्यू झाला. स्वरांग दळवी (६) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचे वडील भांडूपच्या शाळेत संगीत शिक्षक आहेत. “स्वरांग हा आपल्या शालेय मित्रांसोबत मधल्या सुट्टीत शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत होता. खेळत असताना अचानक तो पडल्याची माहिती […]
एनएसजी कमांडोच्या घरातून रिव्हॉल्व्हर, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना अटक
मि लिंदनगर म्हाडा येथील इमारतीत राहणारे एनएसजी कमांडो संदिप पानतावणे (३२) यांच्या घरात घुसून, चोरी करून त्यांची वैयक्तिक रिव्हॉल्व्हर, २० जिवंत काडतूस, ३ तोळे सोने आणि चार हजाराची रोकड लंपास करणाऱ्या दोन चोरांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. शमिम सलिम शेख (२३) आणि सादिक अक्कानी शेख (२३) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून, […]
वीजबिल भरणा केंद्र बंद केल्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, सह्यांची मोहीम
आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या […]
पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अफवा कि सत्य?
कालपासून सोशल मिडियावर पवई तलावातून एक मगर बाहेर आल्याची बातमी व्हायरल होत आहे. मात्र या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आवर्तन पवईने जेव्हा पवई पोलीस, प्राणीमित्र संघटना ‘पॉज मुंबई’ आणि वन विभाग यांच्याशी संपर्क साधला तेव्हा यातील कोणाकडेही पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अधिकृत तक्रार किंवा माहिती कळवण्यात आलेली नसल्याचे या सर्वांनी स्पष्ट केले. काल जोरदार […]
पवई तलावावर गणेश विसर्जनाचे थांबलेले कार्य पूर्ववत
मुंबईत आज सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पवई तलावात सुरु असणारे गणेश विसर्जन काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर ओसरताच पवई तलावातील विसर्जन कार्य पूर्ववत झाले आहे. शुक्रवारी विराजमान झालेल्या गणेशांपैकी पाच दिवसांच्या गणपतींचे आज ठिकठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील अनेक गणेशांचे पवई […]
पेटीएम चोरांच्या टोळीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पेटीएम सुरळीत करून देण्याचा बहाणा करून मुंबईभर अनेक पेटीएम वापरकर्त्यांना चुना लावणाऱ्या टोळीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमित यादव (२८), ब्रिजकुमार यादव (२६), जावेद शेख (२५), संदेश कनोजे (२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अमित हा ऑनलाईन सर्वेचे काम करत असल्याने आणि पूर्वी पैशाचे आदानप्रदान करण्यासाठी वापरात येणाऱ्या पेटीएमसाठी काम करत असल्याने मुंबईमध्ये पेटीएम […]