Tag Archives | sakinaka
दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी […]
३२ एक्टिवा, ६ कारसह सराईत गुन्हेगाराला पवईत अटक
पोउनि समीर मुजावर व टिमची वाहन चोरीच्या गुन्ह्यातील या वर्षीची मुंबईतील सर्वात मोठ्या गुन्ह्याची उकल पवई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या नासीर सद्दान खान (४८) या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३२ एक्टिवा मोटरसायकल व ६ कार पोलिसांनी हस्तगत करत, मुंबईतील सर्वात मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली […]
प्रबोधनकार ठाकरे जयंती निमित्त पवईत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
परिवर्तनवादी विचारवंत मा. प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयआयटी, पवई येथे धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ सप्टेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पवईतील तिरंदाज महानगरपालिका शाळेत ‘प्रबोधनकार ठाकरे आणि परिवर्तनवादी विचार’ या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. पवईतील जनतेसाठी शैक्षणिक […]
गोविंदा रे गोपाळा
चांदिवली गावाची मानाची हंडी – श्री साई गणेश मित्र मंडळ यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे चौक, संघर्ष नगर येथे हंडीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार पूनम महाजन यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना अटक
सा किनाका येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून, त्यास बेदम चोप देऊन, लुटून पसार झालेल्या २ चोरट्यांना पकडण्यात बीकेसी पोलिसांना यश आले आहे. अपहरण आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. साकिनाका येथील कपडे व्यापारी राजकरन यादव यांचे अपहरण करून, त्यांना निर्जन स्थळी घेऊन जावून […]
सुकृतः फाऊन्डेशन – गरिब गरजूंना मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक गोष्टी देणारी संस्था
माझ्या प्रत्येक कृतीतून मला फायदा कसा होईल, या विचाराने वागणाऱ्या समाजात. आपल्याला प्रत्येक कार्यात मदत करणाऱ्या, गरीब आणि गरजू अशा घरकाम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचा परिवार, अनाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम, पवईमधील रहेजा येथील सुकृतः ही संस्था करत आहे. एवढ्यावरच न थांबता ही संस्था, या लोकांसाठी चांगले काहीतरी करा म्हणून लोकांना […]
गलेरियाला महानगरपालिकेचा दणका, दुकानाबाहेर वाढवलेल्या जागेला त्वरित हटवण्याची नोटीस
हिरानंदानीतील गलेरिया शॉपिंग मॉलमधील काही दुकानदारांनी आपल्या दुकानात व समोरील मोकळ्या जागेत बदल करून आपली दुकाने वाढवल्यामुळे मॉलची दुर्दशा झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आता ते या मॉलकडे दुर्लक्ष करून आसपासच्या परिसरात असणाऱ्या मॉल्समध्ये खरेदीसाठी जाणे पसंत करत आहेत. या बद्दल राष्ट्रवादीचे युवा संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंग यांनी पालिकेकडे तक्रार केली […]
पवईकरांच्या भीतीचा फुगा फुटला, पॅराशूट नसून निघाले फुगे
विमानतळ परिसरात दिसलेले पॅराशूट हे कदाचित घातपाताच्या उद्देशाने तिथे आले होते, परंतु ते त्यात सफल होऊ शकले नाहीत आणि ते थेट पवईच्या दिशेने आले आहेत. अशी बातमी पवई परिसरात फिरत असतानाच, सोमवारी दिवसभर विविध तपास यंत्रणांनी पवई भागात राबवलेल्या तपास मोहिमेने पवईकरांची चांगलीच पाचावर धारण बसली. परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु मंगळवारी […]
आमच्या सिंघमला फसवले आहे, खाटपेंच्या समर्थनात स्थानिक जनता रस्त्यावर, मूक मोर्चा आणि सह्यांची मोहीम
साकिनाका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील खाटपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सूर्यवंशी आणि पोलिस शिपाई योगेश पोंडे सह एकूण आठ जणांना मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी गुन्हे शाखेने एका मॉडेलवर बलात्कार आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मात्र ह्या प्रकरणात स्थानिकांचे वेगळेच मत आहे. हे सर्व कट-कारस्थान आहे, कोणीतरी त्यांना ह्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे, […]