पवईतील हिरानंदानी – पवई विहार रोडला जोडणाऱ्या विजय विहार रोडच्या दुरुस्तीनंतर याचे श्रेय घेण्यासाठी पोस्टर, बॅनर आणि सोशल माध्यमातून लोकप्रतिनिधींमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला होता. मात्र, या श्रेयवादाला आठवडा उलटायच्या आधीच विजय विहार रोडवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानेच या रस्त्याची दुर्दशा करत रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ते अशी याची अवस्था केली. […]
Tag Archives | vaishali patil
विजय विहार रोडवरून पवईत श्रेयवाद
पवईतील विजय विहार रोडवर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून, हा रस्ता आम्हीच दुरुस्त केला असल्याचा श्रेयवाद सध्या स्थानिक आमदार आरिफ नसीम खान आणि स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्यात रंगला आहे. दोघांनीही हे काम आमच्याच प्रयत्नातून आणि फंडातून केला जात असल्याचा दावा केला आहे. श्रेयवादात यांचे कार्यकर्ते सुद्धा उतरले असून, सोशल […]
हिरानंदानीत फुटपाथवर येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी लागणार बुलेट बॅरिअर
हिरानंदानी भागात फुटपाथवर चढून येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी ८ ठिकाणी बुलेट बॅरिअर बसवण्यात येणार आहेत. नगरसेवक फंडातून पालिकेतर्फे हे काम केले जाणार आहे. रविवारी या कामाच्या सुरुवातीचा नारळ नगरसेवक (१२२) वैशाली पाटील, स्वीकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, अभिनेता मुकेश रिशी आणि हिरानंदानी नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. पवईतील हिरानंदानी भागात मोठे, सुटसुटीत आणि वाहतूक कोंडी रहित रस्त्यांमुळे महाविद्यालयात […]
नगरसेविका वैशाली पाटील यांच्या प्रयत्नातून तिरंदाज पालिका शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरु
तिरंदाज व्हिलेज पालिका शाळेत इमारतीच्या स्लबचे पोपडे निघून पावसाळ्यात पाणी गळती होत होती. तसेच परिसरात शेवाळ तयार झाल्याने मुले घसरून पडण्याची शक्यता वाढली होती. याची दखल घेत स्थानिक नगरसेविका यांच्या प्रयत्नातून शाळा इमारत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये आधीच मुलांची संख्या कमी झाली होती त्यातच […]
स्वच्छ पवई अभियानाचे तिन तेरा, गोखलेनगरजवळ फुटपाथवर फेकला कचरा
कचरा उचलण्याचे काम करणारा जुना कंत्राटदार राजू आम्हाला त्रास देण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करत आहे – श्रीकांत पाटील (भाजप जेष्ठ कार्यकर्ते – वार्ड १२२) पवईमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ पवई अभियान या उपक्रमाला खोडा घालत पवईमध्ये घाण पसरवण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गोखलेनगर येथील एका पडक्या […]
नवनिर्वाचीत नगरसेविकांच्या हस्ते विकास कामाचा नारळ फुटला
प्रभाग क्रमांक १२२ मधून निवडून आलेल्या पवईच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.वैशाली श्रीकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी हरिओमनगर येथे त्यांच्या कार्यकाळातील विकासाच्या कामाचा पहिला नारळ फोडला गेला. यावेळी येथील माजी नगरसेवक चंदन शर्मा सह परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या निधीतून मलनिसारण वाहिनी बनवण्याचे काम येथे केले जात आहे. २०१७ ते २०२२ […]
पवईत कमळ फुलले; भाजपच्या वैशाली पाटील विजयी
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय नुकतेच जाहीर झाले असून, पवईतील प्रभाग क्रमांक १२२ मध्ये गेली २५ वर्ष सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गडावर भाजपाची उमेदवार वैशाली पाटील यांनी ४८७० मते मिळवत ७०० मताधिक्याने विजयी होत कमळ फुलवले. दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी (४१४०), तिसऱ्या स्थानावर शिवसेना (३५८९) तर चौथ्या स्थानावर कॉंग्रेस (१३०७) पक्षाला समाधान मानावे लागले आहे. प्रभाग क्रमांक […]