पवईतील अँकर ब्लॉक येथे तानसा पूर्व सागरी ९०० मी.मी. व्यासाच्या झडपाच्या दुरुस्ती आणि पवई उच्चस्तरीय जलाशय-१च्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. मंगळवार, २३ मार्चला या कामामुळे पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवईतील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व, धारावी, वांद्रे भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पालिका जल […]
Tag Archives | vihar lake
पाणीपुरवठा करणार्या तलावात ऑक्टोबर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा
पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मात्र या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरात येत नाही. २०२० वर्षात सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला होता. या अंदाजानुसारच पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच आवश्यक तितका पाऊस होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील विशेषतः […]
विहार तलाव होणार सुरक्षित
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावाला सुरक्षित करण्याचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला असून, बंधाऱ्याची दुरुस्ती, संरक्षक भिंत, लोकांना तलाव भागात प्रवेश रोखण्यासाठी उपाययोजना, किनाऱ्यावर पर्यटकांसाठी छोटे बगीचे आणि कठडे अशी सुरक्षा आता विहार तलावाला मिळणार आहे. यामुळे तलावात होणाऱ्या दुर्घटना, उपद्रव रोखण्यात यश मिळणार आहे. सोबतच तलावाचे सौन्दर्यकरण सुद्धा होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्तोत्रांपैकी […]
विहार तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
आपल्या महाविद्यालयीन मित्रांसोबत विहार तलाव भागात फिरण्यासाठी गेलेल्या पवईतील एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. दिपक शिवाजी कुटे (१८) असे या तरुणाचे नाव असून, तो आयआयटी कॅम्पसमध्ये आपल्या परिवारासोबत राहत होता. याबाबत मुलुंड पोलिस अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत. गेल्या काही वर्षात पवई आणि आसपासच्या भागात असणारे तलाव […]
बर्थडे पार्टी साजरी करायला गेलेल्या इसमाचा विहार तलावात बुडून मृत्यू
@रविराज शिंदे साई बांगुर्डा येथे पोहायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी विहार तलाव येथे मित्रांसोबत गेलेल्या एका ५२ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली आहे. अग्निशमन दलाच्या साहय्याने त्यांचा शोध सुरु असून, त्यांना अजूनपर्यंत यश लाभले नाही. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने गेल्या तीन दिवसापासून हाहाकार माजवला आहे. […]
फिल्टरपाडा येथे जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया
@अविनाश हजारे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी विहार तलावाची मुख्य जलवाहिनी पवई, फिल्टरपाडा येथे फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून वाहिनी फुटल्याची तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेला देवून सुद्धा पालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या मुंबईकरांना सतावण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी जवळपास सात तलावांतून मुंबईला […]