जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एका भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवल्याची घटना आयआयटी मेनगेटजवळ घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी भादवि कलम २७९, ३३८ नुसार गुन्हा नोंद करत टेम्पो चालक विजय यादव याला अटक केली आहे.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा येथून भाजी भरून टेम्पो क्रमांक एमएच ४७ एएस ५०५१ हा पहाटे गोरेगाव येथे भाजी पोहचविण्यासाठी जात होता. याचवेळी मालाड येथे शिक्षिका म्हणून काम करत असणाऱ्या उज्वला चौगुले या बसची वाट पाहत आयआयटी मेनगेट भागात उभ्या होत्या.
“भाजीचा टेम्पो जेवीएलआर मार्गे जात असताना आयआयटी मेनगेट भागात येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उज्वला चौगुले यांना टक्कर देत टेम्पो रस्त्याच्या किनाऱ्यावर पादचारी पुलाच्या भिंतीला जावून धडकला.” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “घटनेत चौगुले यांच्या हाताला, डोक्याला जखमा झाल्या आहेत. त्यांना सुरुवातीला हिरानंदानी रुग्णालयात आणि नंतर भांडूप येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.”
No comments yet.