हिरानंदानीतून पार्क केलेल्या रिक्षाची चोरी

हिरानंदानीतून पार्क केलेल्या रिक्षाची चोरी

सावधान ! तुमची वाहने कुठेतरी पार्क करून घरी जात असाल तर सावधान. तुमचे वाहन होऊ शकते चोरी. हिरानंदानीतील रस्त्यांवर पार्क केलेली एक ऑटो रिक्षाची चोरी झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. याबाबत रिक्षा मालकाने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वी तुंगागाव येथून एक मोटारसायकल चोरी झाल्याचे समोर येत असून, याबाबत ही पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अनलॉक सुरु झाले असले तरी अजूनही अनेकांच्या हाताला पुरेसे काम नसल्याने मुंबईकर घरातच आहेत. याचाच फायदा घेत काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी डाव साधला असून, हळूहळू गुन्हेगारीत वाढ होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. हिरानंदानी येथील एका उच्चभ्रू वस्तीत लोक घरात असतानाच एका स्पायडर चोराने २१ लाखापेक्षा अधिकच्या दागिने आणि रोकडवर डल्ला मारल्याचे प्रकरण पाठीमागील महिन्यात घडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच तुंगागाव येथे पार्क करून ठेवलेली मोटारसायकल चोरट्यांनी लांबवली आहे. आता यात भर म्हणून पवईतील हिरानंदानी रुग्णालयाच्या समोर पार्क केलेली एक ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे.

पार्क केलेल्या रिक्षाची चोरी

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पार्कसाईट येथे आपली तीन मुले आणि पत्नी सह राहणारे सदानंद काळे हे बॉम्बे इंटीलीजंस सिक्युरिटी – फ्रंट लाईन या सुरक्षारक्षक कंपनीत काम करतात. कामावरून सुटल्यानंतर ते रिक्षा चालवत असल्याने ते आपल्या मालकीची रिक्षा (क्रमांक एमएच ०३ – सीएन ४४३६) नेहमीच आपल्या सोबत घेवून जात असतात. “मी माझी रिक्षा नेहमीच हिरानंदानी हॉस्पिटल समोर, नॉलेज सिटी बिल्डींग, पोद्दार स्कूल गेटजवळ रस्त्याच्या किनारी उभी करत असतो. मंगळवार, ११ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मी नेहमी प्रमाणे माझी रिक्षा व्यवस्थित लॉक करून हिरानंदानी हॉस्पिटल जवळ, स्वामीनारायण मंदिर याठिकाणी पार्क करून घरी गेलो होतो. गुरुवार, १३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० वाजता मी तिथे जावून पाहिले असता रिक्षा तिथे मिळून आली नाही. असे काळे यांनी पवई पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

पार्कसाईट, हिरानंदानी, ट्राफिक बीट सगळीकडे शोधाशोध करून रिक्षा कुठेच मिळून आली नसल्याने अखेर १४ ऑगस्टला त्यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली आहे.

“याबाबत भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करून, हिरानंदानी भागात जिथे रिक्षा पार्क केली होती त्या भागाच्या आसपास असणारे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवले आहे,” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!