पवईत बेघर झालेल्यांवर अस्मानी संकट; जयभीम नगरमध्ये मोठं झाड कोसळलं

फूटपाथवर झोपलेल्या दोन लहान मुलांना वाचविण्यात यश

– रविराज शिंदे

पवईतील जयभीम नगर येथील रहिवाशांचे डोक्यावरचं छत बेकायदेशीर रित्या तोडल्यानंतर रस्त्यावर आलेल्या कसेबसे आपला संसार चालवणाऱ्या जयभीम नगर रहिवाशांची तारेवरची कसरत दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यातच मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांची आणखीनच परवड होत आहे. त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतानाच पवईतील ते राहत असणार्‍या फूटपाथ लगत असणार भलं मोठं झाड रविवारी रात्री या बेघरांच्या पालांवर कोसळलं.

भरपावसात आपल्या लहान मुलांसोबत ताडपत्रीच्या छपरात हे सर्व निद्रावस्थेत असताना ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, आणि पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल होत झाडाखाली अडकलेल्या दोन लहान मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

तब्बल ३ तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर हे कोसळलेल झाडं कापून वेगळे काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या घटनेत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नसली तरी ह्या बेघर झालेल्या रहिवाशांच्या निवाऱ्यासह सुरक्षेचा मोठा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!