वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट ४ने पवईतून अटक केली आहे. या कारवाईत ३ मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.
काही दलाल मिळून वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ ला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील, अर्चना पाटील, सुनील साळोखे आणि शर्मिला निखाडे यांचे एक पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी डमी ग्राहकाच्या नावावर त्यांच्याशी संपर्क साधत मुलींची मागणी केली. दलालांनी पवई येथील एक हॉटेलमध्ये रूम बुक करून तीन तरुणींना तिथे पाठवले. “रूमवर तरुणी पोहचताच त्यांना ताब्यात घेत, ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या २ दलालांना अटक केली आहे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
पवई आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या हॉटेलमध्ये रूम बुक करून अशा प्रकारे अजूनही काही दलाल कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे, असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
No comments yet.