रस्त्यात गाडी अडवून चालकाकडून जबरी चोरी करून पसार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हेप्रकटीकरण पथकाने २४ तासाच्या आत अटक केली आहे. प्रदीप चव्हाण (१९) आणि संजय वर्मा (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एक्टिवा मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी आयआयटी मेनगेट येथे पवईतील महात्मा फुलेनगर येथे राहणारे धर्मेंदर अरुण यादव यांची गाडी अडवून मोबाईल आणि घड्याळ जबरी चोरी करून तिथून पळ काढला होता.
याबाबत यादवनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सगळा प्रकार सांगत तक्रार नोंद केली होती.
‘फिर्यादीने आपल्या जवाबात मोटारसायकलचा मोडका-तोडका नंबर सांगितला होता. ज्याच्या आधारावर आम्ही माहिती मिळवली असता, कन्नमवार नगर येथे राहणाऱ्या प्रदीप चव्हाण याच्या नावे गाडीची नोंद असल्याचे आढळून आले. चव्हाणच्या चौकशीत त्याचा अजून एक साथीदार संजयसोबत त्याने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
‘भादवि कलम ३९२, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंद करून आम्ही दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेले घड्याळ आणि मोबाईल दोन्ही हस्तगत केले आहेत.’ असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.
पवई पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक्टिवा मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ सीडब्ल्यू ६१०१ सुद्धा हस्तगत केली आहे. दोन्ही आरोपींनी नशेच्या भरात हे कृत्य केले असल्याची कबुली दिली असून, त्यांना कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
No comments yet.