दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले.

गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी आपल्या भक्तांचा निरोप घेतला. पवईमध्ये मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर गणेशघाट अशा दोन ठिकाणी गणेशांचे विसर्जनची सोय करण्यात आली होती.

संध्याकाळी ४ वाजल्यापासूनच पवईमधील अनेक रस्त्यांवर हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून बाप्पा निरोपाला निघालेले होते. पवई आणि साकिनाका पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतलेली होती. दंगा नियंत्रण पथकाला सुद्धा सुरवातीपासूनच तैनात करण्यात आले होते. पवई येथील दोन्ही विसर्जन घाटावर रात्री उशीरापर्यंत अनेक छोट्या मोठ्या बाप्पांचे ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा आग्रहाचे निमंत्रण देत विसर्जन करण्यात आले.

अनेक कुंटुबांनी दीड दिवसांचा गणपती बसविला होता. रिद्धीसिद्धी आणि बुद्धीचा देवता बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

2 Responses to दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

  1. Odeyar September 15, 2018 at 1:30 pm #

    ‘Deed Divsachya Bappala bhavpurna Nirop’ ati sunder niroopan kelay tumhi. Pictures pan khoop chaan aahet. Vachakala gode modak milala sarkha vat-to mala. Abhinanandan..

    • आवर्तन पवई September 23, 2018 at 6:16 am #

      खूप खूप आभार ! आपल्या सारख्या वाचकांच्या प्रतिक्रियाच आम्हाला काम करायला प्रोत्साहन देतात.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes