पवई येथील चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक

aropi solanki

आरोपी रवी सोळंकी

तुंगागाव येथील चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी रवी सोलंकी (२१) व इरफान (२१) अशा दोघांना आज (शनिवारी)अटक केली असून, अंधेरी कोर्टात दोघांना सादर करण्यात आले असता त्यांना अधिक तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे.

आजी-आजोबा आणि आत्यासोबत पवईतील साकिविहार रोडवरील तुंगागाव मुरली चाळीत राहणारी ४ वर्षाची चिमुरडी रविवार ६ मार्च रात्री अकरा वाजल्यापासून गायब होती. याबाबत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच पोलिसांनी निर्जन स्थळे, गटारे येथे पालिका प्रशासनाच्या साहय्याने शोध सुरु केला होता. बुधवारी दुपारी १ वाजता तुंगा परिसरातील बंद पडलेल्या कृष्णा बिजनेस पार्क भागातील झाडीत, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या टाकीत आढळून आला होता.

मुलीच्या वैद्यकीय अहवालात मुलीवर अत्याचार झाला असून, तिची हत्या झाल्याचे समजताच बुधवारी रात्री स्थानिकांनी मेणबत्ती घेऊन शांतीपूर्वक मोर्चा काढून आरोपीस लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती.

पोलिसांनी परिसरातील गर्दुले, नशेखोर, ड्रायव्हर, गाड्या साफ करणारे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते.

घटनास्थळ

घटनास्थळ

“तुंगा गावमध्ये बांधकाम सुरु असणाऱ्या एका इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये आम्हाला ६ ते ७ सेकंदांचे चित्रीकरण मिळाले होते, ज्यात एक तरुण लहान मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून येत होते. रात्रीच अंधेरी पश्चिम येथून क्लिअर करून घेतल्यावर चेहरा स्पष्ट होताच आम्ही अटक आरोपी यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती, ज्यात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अजून एक अधिकाऱ्यानुसार “घटनास्थळावरून आम्हास एक चटई, बाटली आणि कपडा मिळून आला होता. आरोपींना दारू, चरस, गांजा यांचे व्यसन आहे. आरोपींनी नशेत मुलीचे अपहरण करून ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या झाडीत तिच्यावर अत्याचार करून टाकीत टाकून तेथून पोबारा केला होता. मात्र सीसीटीव्हीमध्ये आलेले चित्रिकरण आणि एका १८ वर्षीय मुलाने तिला खेळताना पाहिले होते त्याने आरोपींनाही त्याच वेळेस स्थानिक भागात पाहिलेले होते ज्यावरून पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.”

आरोपींवर भादवी ३६३ (अपहरण), ३०२ (हत्या) व पोस्का गुन्हा नोंद करत पवई पोलिसांनी त्यांना अंधेरी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

3 Responses to पवई येथील चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक

  1. Shabbir ansari October 22, 2016 at 12:38 pm #

    Fashi hi honi chiye

  2. Harold colaco March 13, 2016 at 5:16 am #

    Police should make a watertight case so guilty should get noose.

  3. Anand March 12, 2016 at 4:57 pm #

    या नाराधमला फाशीची शिक्षा द्या

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!