पवईत स्वातंत्र्य दिनानिमित्त १५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

@प्रतिक कांबळे

कोरोना विषाणुचा झपाट्याने होणारा प्रसार आणि त्यात भासणारा रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेता पवईतील आयुष्य फांऊंडेशन संघटनेच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाबाई आंबेडकर नगर २ येथील विश्वशांती बुद्ध विहारात आयोजित या शिबिरात १५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरात सायन रुग्णालयाची रक्तपेढी लाभली होती. पेढ्यामध्ये असणारा अपुरा रक्त पुरवठा बघता पवईतील तसेच आसपासच्या परिसरातील १५७ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना सन्मानपत्र व आकर्षक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

“जेव्हा समाजाला रक्ताचा तुटवडा भासेल त्यावेळी रक्तपुरवठा करण्यासाठी आमची संघटना आयुष्य फांऊंडेशन नेहमी अग्रेसर असेल आणि समाजाला वेळोवेळी हवी ती मदत आम्ही देऊ”, असे संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष नितेश वानखेडे यांनी सांगितले.

रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यामागे आयुष्य फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान लाभले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!