पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूच्या पकडीपासून कोणीही वाचू शकलेले नसून, आता पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाणे हद्दीत आपले कर्तव्य बजावत असताना दोघांना लागण झाल्याचे समोर येत आहे. दोघानांही त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासोबतच पोलीस ठाण्याच्या ४ कर्मचाऱ्यांना खाजगी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कोरोनाची लागण

प्रातिनिधिक छायाचित्र

जगभर कोरोनाने थैमान घातले असून, देशातही कोरोना आपले हातपाय पसरत आहे. यात महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका दोघेही प्रयत्न करत आहेत. यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे काम हे मुंबई पोलीस करत आहेत. मात्र या महाभयावह शत्रूशी लढताना त्याची लागण झाल्याने काही पोलीस कर्मचारी जायबंदी सुद्धा होत आहेत.

“पवई पोलीस ठाण्यातील एका २९ वर्षीय पोलीस शिपायाला कोरोना लागण झाल्याचे २३ एप्रिलला त्याच्या तपासणीतून उघड झाले आहे. त्याच्यावर सध्या पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याचवेळी पाठीमागील काही दिवसापासून बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचार घेणारे पवई पोलीस ठाण्यातील हवालदारचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना मरोळ येथील सेव्हनहिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “दोघांनाही सर्दी, ताप, खोकला असे लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांच्या चाचण्या करण्यात आल्यामुळे त्यांना बाधा झाल्याचे लक्षात आले. दोघांवरही योग्य उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.”

या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले ४ कर्मचारी यांना पवई पोलिसांच्या माध्यमातून साकीनाका येथील एक हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, अहवाल येणे बाकी आहे.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , ,

Trackbacks/Pingbacks

  1. पवईत कोरोना बाधितांची संख्या २२; एकाचा मृत्यू, आठ लोकांना सोडले घरी - April 27, 2020

    […] हे सुद्धा वाचा: पवई पोलीस ठाण्यातील दो… […]

  2. रुग्णवाहिका चालकांकडून पोलिसांचीही लूट » आवर्तन पवई - April 25, 2020

    […] हे सुद्धा वाचा: पवई पोलीस ठाण्यातील दो… […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!