अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठविणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

प्रतिनिधिक छायाचित्र

१७ वर्षांच्या मुलीचा छळ केल्याबद्दल आणि तिला अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी रविवारी गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली आहे. संदीप निषाद (वय २०) आणि कुश यादव (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही पवई परिसरात राहतात. मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत ते तिची छेडछाड करत होते. मात्र ती नेहमीच त्यांना टाळत असे, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निषादने तक्रारदार मुलीच्या मित्राकडून तिचा मोबाइल नंबर मिळवला होता. २७ जुलै रोजी तिला एका अज्ञात क्रमांकावरून संदेश आला, ज्याला मुलीने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर त्या क्रमांकावरून तिला अपमानास्पद, अश्लील संदेश आले, ज्यामुळे तिने लगेच सदर मोबाईल नंबर ब्लॉक केला.

त्यानंतर समोरील व्यक्तीने दुसऱ्या एका नंबरवरून अपमानास्पद आणि अश्लिल संदेश पाठविणे सुरू केले. हे संदेश प्राप्त होताच मुलगी घाबरली आणि तिने आपल्या आईवडिलांना याबद्दल सांगितले. मुलीला विश्वासात घेत त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत ९ ऑगस्ट रोजी पवई पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला.

पवई पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असतानाच गुन्हे शाखेच्या युनिट १० ने सुद्धा याचा समांतर तपास सुरू केला होता. मोबाईल नंबर आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारावर पहिला क्रमांक संदीप निषाद तर दुसरा क्रमांक हा कुश यादव नामक तरुणांचा असल्याचे उघड झाले. दोघांनाही तांत्रिक माहितीच्या आधारावर शोधून युनिट कार्यालयात आणून चौकशी केली असता, दोघांनी या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गुन्हे शाखेने दोघांचेही गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हस्तगत करत पुढील चौकशीसाठी त्यांना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या दोघांना भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ५०९, ३५४ (५) अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!