पवई तलावाजवळ कारला आग

पवई तलाव मुख्य गणेशघाटाजवळ एका कारला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनेत गाडीचे जळून मोठे नुकसान झाले आहे.

टूअर्स अंड ट्राव्हल कंपनीसाठी काम करणारे राजेंद्रकुमार मेहतो हे नेहमी प्रमाणे आपल्या वेगेनॉर गाडीतून (क्रमांक एमएच ०४ जिडी ५१६७) प्रवासी घेवून जेवीएलआर मार्गे कांजूरच्या दिशेने जात होते. त्यांची गाडी पवई तलाव मुख्य गणेश घाटाजवळ येताच बंद पडली.

“बंद पडलेली गाडी चालू होत नसल्याने त्यांनी आपल्या गाडीतील प्रवाशाला उतरवून दुसऱ्या गाडीत बसवून पाठवून दिले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “थोड्या वेळाने गाडी चालू तर झाली मात्र ती काही केल्याने बंद होईना. त्यांनी बरेच प्रयत्न केले मात्र गाडी बंद होण्याऐवजी गाडीतून धूर निघायला सुरुवात झाली.”

काही वेळातच गाडीच्या इंजिन जवळील भागात आग पकडत तिने गाडीला आगीच्या कवेत घेतले. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तो पर्यंत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गाडीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!