पवईत ५० हजार मातीच्या दिव्यांनी साकारले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट

शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पवईकर कलाकार चेतन राऊत याने  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पवई येथील हरिश्चंद्र मैदानावर एक आकर्षक पोर्ट्रेट साकारले आहे.

कलाकार चेतन राऊतने ५०,००० मातीच्या दिव्यांचा वापर करून ६ रंगछटाचे दिवे वापरून हे पोर्ट्रेट तयार केले आहे. ४० फूट उंच आणि ३० फूट रुंद असे हे पोर्ट्रेट चेतन याने बनवले आहे. यासाठी त्याला ९ तास लागले असून १५ जणांनी सहाय्य केले आहे.

हे चित्र पाहण्यासाठी नागरिकांनी आजपासून पवईतील हरिश्चंद्र मैदानात गर्दी केली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून म्हणजेच रविवार, २३ जानेवारीपासून ते २५ जानेवारीपर्यंत नागरिकांना हे पोर्ट्रेट पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनेक शिवसैनिक ठिकठिकाणी विविध उपक्रमातून त्यांना अभिवादन करतात. मात्र पवईतील मोजेक पोर्ट्रेट कलाकार चेतन याने तब्बल ५० हजार दिव्यांपासून बाळासाहेबांचे पोर्टेट चित्र साकारून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

चेतनने त्याच्या कलेवरील प्रेमापोटी आजपर्यंत तब्बल १४ विश्वविक्रम आपल्या नावावर केले असून त्याचा हा प्रवास सुरूच आहे.

Artist Chetan Raut creates mosaic art of late Balasaheb Thackeray with 50,000 diyas

Powai-based Mosaic Artist Chetan Raut pays a unique tribute to Shiv Sena chief Balasaheb Thackeray on his 96th birth anniversary. Chetan created a 40 ft Height by 30 feet width mosaic art portrait of late Balasaheb Thackeray using 50,000 diyas in six colours. The portrait is to be showcased between January 23rd to 25 January at Harishchandra Maidan in Powai.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!