५० हजार मातीच्या पणत्यांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मोझेक पोर्ट्रेट

चेतनने ५० हजार मातीच्या पणत्यांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मोझेक पोर्ट्रेट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पवईकर मोझेक पोर्ट्रेट कलाकार चेतन राऊत याने ५०,००० मातीच्या पणत्यापासून ४० फूट बाय ३० फूट आकाराचे पोर्ट्रेट साकारत त्यांना मानवंदना दिली आहे. तीन दिवस ठाणे येथील तलाव पाली येथील शिवाजी महाराज मैदानात हे मोझेक पोर्ट्रेट पाहता येणार आहे.

१९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. कोरोनाचे संकट लक्षात घेत मोठ्या काळजीपूर्वक ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. पवईकर मोझेक पोर्ट्रेट कलाकार चेतन राऊत याने ५०,००० मातीच्या पणत्या पासून छत्रपती शिवाजी महाराजांचे ४० फूट बाय ३० फूट आकाराचे पोर्ट्रेट साकारत त्यांना मानवंदना दिली.

लाल, पिवळा, पांढरा, काळा, हिरवा, निळा अशा ६ रंगाच्या मातीच्या पणत्याचा यात वापर करण्यात आला आहे. हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी ४८ तासाचा कालावधी लागला. पोर्ट्रेट साकारण्यासाठी सुरेखा राऊत, सिद्धेश रबसे, कुणाल घाडगे, मयूर अंधेर, प्रमिला जंगले, पूजा लहाने, निशिकांत राऊत, निशांत गावित, सिद्धी गावित, निशिता पाटील यांनी चेतनला साथ दिली आहे.

सकल मराठा समाज, ठाणे यांच्यावतीने आयोजित आणि चेतन आणि टीमच्या मदतीने साकारलेले हे पोर्ट्रेट नागरिकांना १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलाव पाली, ठाणे (प) येथे पाहता येणार आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!