साकीनाका येथे दुकानाला भीषण आग; तीन गंभीर जखमी

साकीनाका, खैरानी रोड येथील दुकानाला आग लागल्याची घटना १९ जानेवारीला मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या आगीत तीन जण गंभीररित्या जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

खैरानी रोड, न्यू इंडिया मार्केट येथील रेहमानी हॉटेल जवळील एका दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत टिळक रामदास (वय१७), रफिक अहमद (वय ४०), अमितकुमार (वय ३८) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना प्रथम राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर यातील दोघांना ऐरोली येथील नॅशनल बर्न केअर सेंटर येथे तर एकाला घाटकोपर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!