पवई, चांदिवली पाच तास थांबली

प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे, रमेश कांबळे

जेव्हीएलआरवर निर्माण झालेली वाहतूक कोंडी

“मुंबापुरी आणि मुंबईकर कितीही संकटे आली तरी कधीच थांबत नाहीत” असे म्हटले जाते. मात्र, मुंबईचा भाग असणारे पवई आणि चांदिवली आज जवळपास ५ तास वाहतूक कोंडीत थांबली. पवई आणि चांदिवली भागात सकाळी ९ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास पाच तास शाळेच्या मुलांपासून कामावर निघालेल्या चाकरमान्यांपर्यंत सर्वच यात अडकून पडले होते.

जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोड (जेव्हीएलआर) पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडत असल्यामुळे नियमित या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात संपूर्ण मुंबईचा वेग हा आपोआप मंदावतो. अशात एक छोटासा अडथळा सुद्धा जेव्हीएलआरवर वाहतूक कोंडी निर्माण करायला पुरेसा असतो आणि जेव्हीएलआरवर निर्माण होणारी वाहतूक कोंडीचा परिणाम आपोआप याला जोडून असणाऱ्या चांदिवली आणि पवई परिसरातील वाहतुकीवर होतो.

मिलिंदनगर येथे पडलेला भला मोठा खड्डा

आज, शुक्रवारी सुद्धा या परिसरात असेच काहीसे पहायला मिळाले. मिलिंदनगर येथे रस्त्यावर पडलेला एक मोठा खड्डा आणि एनएमएमटीची बंद पडलेली बस यांनी आज केवळ जेव्हीएलआरच नव्हे तर चांदिवली, साकीविहार रोड आणि पवईचा संपूर्ण परिसर जाम करून टाकला होता.

एल अँड टी येथे बंद पडलेली एनएमएमटीची बस

‘सकाळी जोगेश्वरीच्या दिशेने जाणारी एमएमटीची बस क्रमांक एमएच ४३ एच ५२९३ लायनर जाम झाल्यामुळे एल अँड टी येथे रस्त्याच्या मधोमध बंद पडली होती आणि त्यातच भर म्हणून मिलिंदनगर येथे रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला होता त्यामुळे वाहतूक धिमी झाली होती’ असे याबाबत बोलताना साकीनाका वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. ए. माने यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले ‘क्रेनच्या साहय्याने बसला रस्त्याच्या बाजूला करत आमच्या काही कॉन्स्टेबलनी मिळून मिलिंदनगर येथे रस्त्यावर पडलेल्या खड्यात खडी, दगड-माती टाकून भरून काढत वाहतूक सुरळीत करण्यात आली.’

वाहतूक सुरळीत होईपर्यंत दुपार झाली होती आणि तोपर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे जोगेश्वरी विक्रोळी – लिंकरोडसह पूर्व धृतगती मार्गापर्यंत याची झळ पोहचली होती. या मार्गांवरून प्रवास करणारे तसेच पवई आणि चांदिवली परिसरात राहणारे रहिवाशी तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. नक्की काय घडले आहे हे माहिती पडत नसल्यामुळे अनेकांनी सोशल मिडीयाची मदत घेतल्याने सोशल मिडीयावर सुद्धा मॅसेजेसची गर्दी झाली होती. अखेर दुपारी वाहतूक सुरळीत झाल्यावर गर्दी कमी होत मुंबई पुन्हा धावायला लागली.

, , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to पवई, चांदिवली पाच तास थांबली

  1. Herold colaco July 9, 2018 at 4:50 pm #

    There are other problems for traffic jams. Indiscipline driving.Enceonnchment by shopkeepers on pavement due to pedestrian can not walk on pavement. Walkers occupied both sides of roads. And remaining roads is for there for two three four wheelers. I think make the way for pedestrian .And the jam problem with be solved. And self discipline among us while driving is important too. HAPPY DRIVING FRIENDS!

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes