पवईतील शाळांचा एसएससी बोर्ड परीक्षा, २०२०चा १००% निकाल

सुषमा चव्हाण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पवईतील सर्वच शाळांचा निकाल १००% लागला आहे. एसएम शेट्टी स्कूल, गोपाल शर्मा मेमोरियल स्कूल, पवई इंग्लिश हायस्कूल आणि ज्ञान विद्या मंदिर ह्या शाळांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डिस्टिंक्शन श्रेणीत गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

एसएम शेट्टी स्कूलच्या श्रेया वायंगणकर हिने ९८.४% गुण मिळवून या शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. गोपाल शर्मा मेमोरियल स्कूलच्या इच्छा कुंभार हिने ९६.४०% गुण मिळवत तर पवई इंग्लिश हायस्कूलच्या जतिन जैन याने ९२.६० गुण मिळवत आपापल्या शाळेत प्रथम क्रमांक पटकावले आहेत.

दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. यंदा दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० पर्यंत होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत.

एसएम शेट्टी शाळा

डावीकडून – श्रेया वायंगणकर (९८.४%) झील सुंधानी (९७.६%) आणि संवेदी भैसारे (९७%)

तुम्ही जितके कष्ट करता त्याचे फळ तुम्हाला मिळते. बंट्स संघाच्या एस एम शेट्टी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी २०१९-२०२०मधील एसएससी बोर्डाच्या परीक्षेत पुन्हा एकदा अतुलनीय यश संपादन केले आणि सलग अठराव्या वर्षी सुद्धा बोर्डावर १००% निकाल लावला आहे. परीक्षेला बसलेल्या २२७ विद्यार्थ्यांपैकी १८२ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन श्रेणीतील गुण मिळवले आहेत. ४२ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, तर ४३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास) आणि दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी (सेकंड क्लास) मिळविली आहे.

श्रेया वायंगणकर ९८.४% गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. यानंतर झील सुंधानीने ९७.६% मिळवत द्वितीय आणि संवेदी भैसारेने  ९७% गुण मिळवत शाळेत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

“आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाने आम्ही खूप आनंदी आहोत त्यांचा आम्हाला अभिमान आहे. हे उल्लेखनीय यश सर्वांचे कठोर प्रयत्न दर्शविते. आम्ही या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शुभेच्छा देतो,” असे यावेळी बोलताना शाळेतर्फे सांगण्यात आले.

पवई इंग्लीश हायस्कूल

डावीकडून -जतिन जैन (९२.६०%), गीता बांबानिया (९१.८०), साहिल नाईक (९१.४०%) आणि सौमित्र चौबे (९१.४०%).

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये यावर्षी पवई इंग्लिश हायस्कूलने (पीईएचएस) सुद्धा १००% निकाल लागला आहे. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेसाठी १६३ विद्यार्थी बसले होते. यापैकी ८३ विद्यार्थी डिस्टिंक्शन मिळवत, ७४ विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवत, तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

जतिन जैन ९२.६०%; गीता बांबानिया ९१.८०; सौमित्र चौबे आणि साहिल नाईक ९१.४०% गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि त्रितीय शालेय क्रमवारीत आहेत. इतर रँकिंगमध्ये आहेतः रीदा शिरगावकर ९०.८०%; जैनी छेडा ९०.६०%; समिका यादव – ९०.२०%.

याबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शिर्ले उदयकुमार म्हणाल्या, “मी निकालावर समाधानी आहे. आमचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले आहेत. पुढील वर्षी, मला आशा आहे की आम्ही निकालामध्ये सुधारणा करू.” पवईच्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक पीईएचएस आहे.

गोपाल शर्मा मेमोरियल स्कूल

डावीकडून – इच्छा कुंभार (९६.४०%) रेवती नातू (९५%) आकांक्षा चतुर्वेदी (९४.८०%) मधुरा गावकर (९४.६०%) परी भगत (९३.८०%)

गोपाल शर्मा मेमोरियल स्कूलचे विद्यार्थी पाळत असणाऱ्या ‘यशस्वी होईपर्यंत सराव’ या नियमाला यश प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात पुन्हा एकदा शाळेला १००% निकाल मिळवून दिला आहे.

या शाळेच्या इच्छा कुंभार ९६.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम आली आहे. तर या पाठोपाठ ९५ टक्के गुण मिळवत रेवती नातू ही द्वितीय आणि आकांक्षा चतुर्वेदी हिने ९४.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या व्यतिरिक्त मधुरा गावकर ९४.६०% आणि परी भगत हिने ९३.८०% गुण मिळवले आहेत.

१४ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. ७६ विद्यार्थी हे डिस्टिंक्शन तर २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत.

ज्ञान विद्या मंदिर

पवईतील सर्वात जुनी मानली जाणारी अजून एक शाळा म्हणजे ज्ञान विद्या मंदिर. या शाळेने सुद्धा यावर्षी घवघवीत यश संपादन केले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!