चांदिवलीत स्टुडिओला आग, जीवितहानी नाही

साकीविहार रोडवर चांदिवली येथे असणाऱ्या एका स्टुडिओला आग लागल्याची घटना आज, शनिवार, १८ जुलै रोजी घडली. एसीमध्ये ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सगळेच बंद असल्यामुळे सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद होते. मात्र काही दिवसांपूर्वीच चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. “चांदिवली येथे असणाऱ्या या स्टुडिओमध्ये अनेक मालिकांचे चित्रीकरण होते. आग लागली तेव्हा सुद्धा एका प्रसिद्ध मालिकेचे चित्रीकरण येथे सुरु होते.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास साकीविहार रोडवरील बालाजी स्टुडिओला आग लागल्याची माहिती पवई पोलिसांना प्राप्त झाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या आणि पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

“स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर एसीचे सहा ड्क्त आहेत त्यांच्यात आग लागली होती. ड्क्तच्या वरील भागात असणाऱ्या डांबरला आग पकडल्याने आग पसरली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीत कोणीही जखमी झालेले नाही.” असे याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग मिलिंद खेतले यांनी सांगितले.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!