बँकिंग डिटेल्स चोरून ९०३ कोटीच्या फसवणूकीत तैवानच्या नागरिकाला अटक

९०३ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या चु चुन-यू याला पोलिसांनी हैद्राबाद येथे अटक केली आहे. तैवानचा नागरिक असलेला चुन-यू हा पवई परिसरातील पंचतारांकित हॉटेलमधून फसवणुकीचे काम करत होता.

चुन-यू याने येथे एक घर देखील भाड्याने घेतले होते, मात्र तो तेथे त्याच्या एजंटांशी कधीच भेटला नाही. त्याऐवजी हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत बैठका करत असे. तो कुरियरद्वारे खाते वापरकर्त्यांच्या सिमकार्ड आणि बँक खात्याची माहिती कंबोडियाला पाठवत असे.

बँक खात्यांशी जोडलेले मोबाईल क्रमांकाचे सिमकार्ड तसेच बँक खाते तपशील गोळा करून ते कंबोडियाला कुरियर करण्याची जबाबदारी चुन-यूवर सोपवण्यात आली होती. त्याचा चीन स्थित हँडलर हुआन झुआन जेव्हा जेव्हा साहित्य भेटणार असेल तेव्हा एक किंवा दोन दिवस त्याला हॉटेलमध्ये थांबण्यास सांगे.

चुन-यू हॉटेलमध्ये चेक इन करताना हॉटेल कर्मचार्‍यांना त्याच्या नावे एक कुरिअर येणार असल्याची माहिती देत असे. पॅकेज मिळाल्यानंतर तो हॉटेल सोडून त्याच्या अपार्टमेंटमध्ये परत जात असे.

कंबोडियाला इअर बड पाठवण्याच्या नावाखाली चुन-यू सर्व माहिती पाठवत होता. माहिती कुरिअरद्वारे कंबोडियाला पाठवण्यापूर्वी सिमकार्ड आणि बँक खात्याच्या माहितीसह स्लिप्स मोबाईल फोनच्या इअरफोन्स केसमध्ये लपवण्यात येत. बँकेची माहिती दिसू नये म्हणून बँकेची माहिती छोट्या स्लिपवर लिहिलेली असे. प्रवासादरम्यान आतील सामान ट्रॅक होऊ नये म्हणून ही शक्कल लढवली जात होती.

सिमकार्ड आणि बँक खात्याचे तपशील त्याच्या हँडलर्सद्वारे ऑनलाईन बँकिंग क्रियाकलापांसाठी वापरले जात होते. या माहितीचा वापर फसवणूक करणाऱ्यांनी देशभरातील पीडितांकडून पैसे मिळविण्यासाठी केला होता.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!