नव्या पिढीच्या संभाषणाचे माध्यम असणाऱ्या सोशल मिडियामुळे अनेक कामे झटपट होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेच गेली अनेक महिने एनटीपीसी सिग्नल समोर लावण्यात आलेल्या वाहतूक फलकामुळे सिग्नल दिसण्यासाठी प्रवाशांना होणारी अडचण एक बँक कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांच्या @mumbaipolice ट्वीटरवर टाकताच दोन तासातच अडचण करणारा वाहतुकीचा फलक हटवण्यात आला आहे.
घाटकोपर येथील रहिवाशी व बँक कर्मचारी असणारे केबीएस मूर्ती हे दररोज घाटकोपर ते गोरेगाव असा पवई मार्गे प्रवास करतात. पाठीमागील आठवड्यात प्रवासा दरम्यान गाडी जोगेश्वरी-लिंक रोडवर असणाऱ्या एनटीपीसी सिग्नलवर उभी असताना त्यांच्या लक्षात आले कि, येथे वाहतुकीचा ‘नो यु टर्न’ दर्शवणारा फलक अशा पद्धतीने लावला गेला आहे कि, ज्याच्यामुळे समोर असणाऱ्या सिग्नलचे पिवळा आणि हिरव्या रंगाचे सिग्नल हे प्रवाशांना दिसत नाहीत. याबाबत त्यांनी लगेच त्या परिस्थितीचा फोटो काढून मुंबई पोलिसांच्या आधिकारिक ट्वीटर अकौंट @mumbaipolice वर ट्वीट करून याची माहिती दिली.
“आम्हाला वरिष्टांचा याबाबत निरोप मिळताच तिथे वाहतूक नियंत्रणासाठी असणाऱ्या पोलीस शिपायाला सांगून अडचण करणारा बोर्ड आम्ही त्वरित हटवला आहे”असे आवर्तन पवईशी बोलताना साकीनाका वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “आम्हाला मुंबई पोलिसांच्या ट्वीटर अकौंटवर दररोज शेकडो ट्वीटस येत असतात. यातील अनेक सूचनात्मक असतात. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीला सोपस्कार करण्यासाठी मुंबईकर पुढे येत आहेत ही जमेचीच बाजू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या सूचना आमच्या पर्यंत सोपस्कार माध्यमातून पोहचवण्यासाठी पुढे यावे.”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.