आज संपूर्ण देशभरात ७३वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वे वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्रित जमा होण्यावर काही निर्बंध घातले असले तरीही या वर्षीही तेवढ्याच उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पवई आणि चांदिवली परिसरात पाहायला मिळाला.
पवई आणि साकीनाका पोलीस ठाणे आणि त्यांच्या हद्दीतील विविध भागात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले. तर काही ठिकाणी महिला तर काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या विविध कार्यक्रमांची टिपलेली ही काही क्षणचित्रे…
No comments yet.