पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या पवईतील १२ वर्षीय अयान शांकता याच्या पर्यावरणासंबंधित कठीण समस्यांवर उपाय काढण्याच्या प्रकल्पासाठी ‘२०२१ इंटरनॅशनल यंग इको-हिरो’च्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अयान याने ‘पवई तलावाचे संवर्धन आणि पुनर्वसन‘ यासाठी ८-१४ वर्ष वयोगटात तिसरे स्थान पटकवले आहे. अयान हा जगभरातील २५ तरुण पर्यावरण कार्यकर्त्यांपैकी एक असून ‘अॅक्शन फॉर नेशन’ने त्याला इंटरनॅशनल यंग […]
साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७, ३७६, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहितीही समोर येत आहे. पीडित महिलेची परिस्थिती […]
पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी […]
पवई, साकीनाका भागातून डंपर चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या ५ तासात माग काढत अटक केली आहे. पप्पु उर्फ बहादुर राममनी आदिवाशी (वय ३० वर्षे) राहणार उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० लाख किंमतीचा डंपर हस्तगत केला आहे. फिर्यादी मोहम्मद बिलाल छांगुर चौधरी यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी […]
पवई पोलिसांनी जप्त केलेली अरमान खान याची मोटारसायकल बाईकवरून स्टंट करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या एका २१ वर्षीय सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सर तरुणाला पवई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची विनापरवाना मोडीफाईड मोटारसायकल जप्त केली आहे. एवढ्यावरतीच न थांबता त्याचा मोटारसायकल चालवण्याच्या परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुन्हा असे कृत्य […]
@प्रतिक कांबळे कोरोना विषाणुचा झपाट्याने होणारा प्रसार आणि त्यात भासणारा रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेता पवईतील आयुष्य फांऊंडेशन संघटनेच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाबाई आंबेडकर नगर २ येथील विश्वशांती बुद्ध विहारात आयोजित या शिबिरात १५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात सायन रुग्णालयाची रक्तपेढी लाभली होती. पेढ्यामध्ये असणारा अपुरा […]
@अविनाश हजारे | पवईतील गणेशनगर येथील एकमेव रेशनिंग दुकान शिधावाटप प्रशासनाने इतरत्र हलवल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, याविरोधात आता नागरिकांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. भांडूप शिधावाटप कार्यालय अंतर्गत असलेल्या ३० ई ९५ व ३० ई ९६ ही दुकाने पवईतील गणेशनगर भागात अनेक वर्षांपासून कार्यरत होती. टाळेबंदीच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात […]
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिलांनी त्या कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. असेच दोन महिलांचे धाडसी काम बुधवारी पवईतील हिरानंदानी भागात पाहायला मिळाले. येथे गस्तीवर असणाऱ्या महिला कमांडोनी संपूर्ण मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या लॅपटॉप चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रमजान मोहमद सय्यद (२६) आणि विशाल भरत काळे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही […]
पवई तलाव डॅम भागात शुक्रवारी एक १३ वर्षीय मुलाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. २ दिवसांपासून बेपत्ता असणारा हा मुलगा आपल्या काही मित्रांसोबत येथे फिरण्यासाठी आला होता. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीमरी येथे राहणारा वैष रईस खान हा आपल्या काही मित्रांसोबत पवई तलाव भागात फिरण्यासाठी आला होता. डॅमवर आल्यावर त्यांना भिजण्याचा मोह आवरला नाही […]
सैन्यात अधिकारी असल्याचे सांगत एका माजी सैनिकाला ३.५ लाखाचा गंडा घातल्याची घटना सोमवारी पवईत घडली आहे. या संदर्भात पवई पोलीस माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. पवईतील हिरानंदानी भागात राहणारे मुकेश भार्गवा यांना आपले घर भाड्याने द्यावयाचे असल्याने त्यांनी याबाबत असे व्यवहार करणाऱ्या एका वेबसाईटवर आपली जाहिरात दिली होती. “जाहिरात […]
परदेशी नागरिक असणारी एक ५० वर्षीय महिला पोलिसांना पवईत मृतावस्थेत मिळून आली आहे. गुरुवार, १५ जुलैला संध्याकाळी चैतन्यनगर भागात ही महिला तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत पोलिसांना मिळून आली. स्थानिक रुग्णालयात किडनीच्या आजारामुळे ती डायलेसिस घेत होती. प्रथमदर्शनी तिचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियन नागरिक […]
एकीकडे कोविड -१९ सारखा साथीचा आजार जनजीवन उध्वस्त करीत आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर काहींनी घरातील कमावता माणूसच गमावला आहे. अशात पवई स्थित शैक्षणिक कार्य करणारी स्वयंसेवी संस्था विद्या मुंबई अशा कुटुंबाला किराणा सामान आणि शिजवलेले अन्न वाटप करत आधार देण्याचे काम करत आहे. कोरोनामुळे सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील बेरोजगारांमध्ये, स्थलांतरित […]
पेट्रोल आणि डिझेल महागले असताना एवढे महाग इंधन खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये मिठाई वाटून कॉंग्रेसचा निषेध. सरकार मोठ्या प्रमाणात आकारत असलेल्या कराबाबत लोकांमध्ये जनजागृती केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात सोमवार, १२ जुलै रोजी विक्रोळी तालुका कॉंग्रेस आणि वॉर्ड १२२च्या वतीने पवईतील आयआयटी मेनगेट येथील पेट्रोल पंपाजवळ निषेध करण्यात आला. […]
चांदीवली येथील लेकहोम जवळ एका डिलिव्हरी बॉयला डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. डिलिव्हरी बॉय सकाळी कामावर हजर होत असताना मोटारसायकल घसरल्याने डंपरखाली आल्याने ही घटना घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत डंपर चालक मोहम्मद आरिफ मोहंम्मद याकूब शहा (३४) याला अटक केली आहे. चांदीवली येथील संघर्षनगर भागात राहणारे आणि डिलिव्हरी बॉय म्हणून […]
यंदाच्या बोधमार्ग फाऊंडेशनच्या डिजीटल अंतर्वारीमध्ये माईंचा सहभाग माईसोबत मनाची डिजीटल अंतर्वारी जगभरातील विविध भाषिक तरुणाईचा उत्फुर्त प्रतिसाद यंदा डिजीटली अनुभवा मनाची ‘बोधवारी’ बोधमार्ग फाऊंडेशनतर्फे १२ जुलै ते २० जुलै दरम्यान ऑनलाईन अंतर्वारी अर्थात बोधवारी साजरी करण्यात येत आहे. या वारीला हजारो लेकरांची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ या आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. बोधमार्ग फाऊंडेशनचे संस्थापक […]
व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करांना पवई परिसरातून शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट १० ने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सुनील कुलकर्णी (४९), राहणार कोथरूड पुणे आणि अन्वर अब्दुल खुदुस शेख (५५) वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ किलो वजनाची […]
पवईतील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी परदेशी नागरिक असल्याचे भासवत सोशल माध्यमात बनावट खाते बनवून, मैत्री करून नंतर मोबाईलवर संपर्क साधत भारतातील गरीब कोविड रुग्णांना मदत म्हणून पैसे पाठवण्याच्या बहाण्याने २०.४७ लाखाची फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना पवई पोलिसांनी शनिवारी नोएडा, उत्तरप्रदेश येथून बेड्या ठोकल्या आहेत. राहुल विनोद तिवारी (वय २१ वर्ष), आसिम समशाद हुसेन (वय २३ […]
इंग्रजी दैनिकाच्या माजी पत्रकार महिलेने चांदिवली येथील नहार अमृत शक्ती येथील तुलीपिया इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून आपल्या ७ वर्षीय मुलासह उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रेश्मा ट्रेंचिल (४४) असे या महिलेचे नाव असून, तिने लिहलेल्या सुसाईडच्या नोटच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद करत एका […]
प्रतिक कांबळे कोरोनाच्या महासंकटाने बघता बघता बऱ्याच लोकांचा रोजगार नाहीसा झाला आहे. याचीच दखल घेत पवईतील भीमसेना प्रतिष्ठानतर्फे पवईतील गरजू व अंपग व्यक्तींना पितृ दिनाच्या निमित्ताने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. संस्थेच्या तरुणांनी आपल्या या कार्यातून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. प्रतिष्ठानतर्फे अन्नधान्य किट वाटपाच्या कार्यक्रमासोबत कोरोना काळात निस्वार्थ काम करणाऱ्या पवईतील समाजसेवक […]
