जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मानवी साखळीतून केली जनजागृती रविराज शिंदे ‘भ्रष्टाचाराचा बोलबाला, पवई तलावाचा नाला केला’ ‘दुर्लक्ष कोणाचे? लोकप्रतिनिधींचे, पालिका प्रशासनाचे’ या घोषणांनी रविवारच्या सकाळी पवई तलाव परिसर निनादला. पवई तलावात पावसाचे पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांमधून येथील वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. तलावाची होणारी दुर्दशा रोखण्यासाठी व नैसर्गिक अस्तित्व राखण्यासाठी ‘युथ पॉवर’ संघटनेने […]



















