Archive | Crime

प्रातिनिधिक छायाचित्र

 बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्या प्रकरणी पवईतून दोघांना अटक

बेकायदेशीरपणे बंदुक विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना पवईतून अटक करण्यात आली आहे. सचिन किशवाह (१८) आणि अमरकुमार बादशाह नई (२३) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मुंबई पोलिसांच्या युनिट – १०ने ही मोठी कारवाई केली. पवई परिसरात दोन व्यक्ती शनिवारी बेकायदेशीर बंदुक विकण्याचा प्रयत्न […]

Continue Reading 0
INR notes cheating copy

म्हाडाची स्वस्त सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ३० लाखांची फसवणूक

एका खासगी बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्याच एका मित्राने ३० लाखांला गंडा घातला आहे. पवई येथे बाजारभावापेक्षा कमी दरात म्हणजेच ८५ लाख रुपयांमध्ये ९७० चौरस फूट फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी मित्राला ३७ लाख रुपये दिले असून, उर्वरित रक्कमेसाठी कर्ज घ्यायचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आपले पती […]

Continue Reading 0
Thrilling Daytime Burglary Shakes Crystal Palace, Powai

क्रिस्टल पॅलेस इमारतीत घरफोडी, १० लाखाची रोकड पळवली

पवईतील रामबाग येथील क्रिस्टल पॅलेस इमारतीत फ्लॅट फोडून चोरट्याने घरातील १० लाखाची रोकड पळवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. घरातील महिला कामानिमित्त मुंबईबाहेर असताना चोरट्याने हा डाव साधला आहे. विशेष म्हणजे महिलेच्या वडिलांच्या रामबाग येथील घरात पाठीमागील आठवड्यात नोकराने चोरी केली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली गुरव (बदललेले […]

Continue Reading 0
Rs 84 lakhs gold coins stolen from a shipping recruitment company in Powai

पवईतील शिपिंग कंपनीतून ८४ लाखाच्या सोन्याच्या नाण्यांची चोरी

पवई येथील शिपिंग रिक्रूटमेंट कंपनीच्या कार्यालयातून ₹८४ लाख किंमतीची सोन्याची नाणी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ९ ऑगस्ट रोजी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तिजोरी तपासली असता लॉकरमधून सोन्याची नाणी गायब असल्याचे आढळून आले. जगभरातील विविध शिपिंग-संबंधित कंपन्यांच्या आवश्यकतांनुसार जहाज क्रूची नियुक्ती आणि व्यवस्थापन करणाऱ्या पवईतील शिपिंग रिक्रुटमेंट कंपनीचे संचालक व महाव्यवस्थापक यांनी याबाबत पवई […]

Continue Reading 0
To Live a luxurious life two minors broke flat in Hiranandani, Powai

आलिशान जीवन जगण्यासाठी अल्पवयीन मुलांची पवईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी

आपल्या मित्रांना पाहून अलिशान जीवन जगण्यासोबतच सुखवस्तू मिळवण्यासाठी २ अल्पवयीन मुलांनी पवई, हिरानंदानी येथील एका उच्चभ्रू इमारतीत फ्लॅट फोडून ३.४५ लाखाचे सोन्या हिऱ्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यातील एक नीट परीक्षेची (NEET) तयारी करत आहे तर दुसरा इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. दोघेही सधन कुटुंबातील असून, चांदिवली आणि हिरानंदानी येथील […]

Continue Reading 0
raj grandeur

Daring Daylight Burglary: Masked Thieves Strike Powai’s High-rise Building, Escape with Lakhs in Gold and Cash

In a bold daylight theft, masked burglars break into an upscale residential complex in Powai on Monday, making off with gold ornaments and cash worth ₹3 lakh. The dramatic theft has left the local public on edge as theft incidents increased in the area. The audacious burglary occurred at the Raj Grandeur building, where two […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

पवई म्हाडा इमारतीत चोरट्यांनी २ घरे फोडली

मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी झाली असून, याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला आहे. पवई परिसरात देखील अशा काही घटना समोर आल्या असून, पवईतील म्हाडा इमारतीत चोरट्यांनी विविध दोन माळ्यांवरील घरे फोडून १.८९ लाखाच्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर हात साफ केला आहे. पवईतील विविध व्हाट्स ऍप गृप्समधून पवई […]

Continue Reading 0
mumbai police return stolen gold property

घरकाम करणाऱ्या महिलेचा ५.८ लाखाच्या दागिन्यांवर डल्ला

घरकामासाठी असणाऱ्या महिलेवर विश्वास ठेवून तिच्या ताब्यात घर सोपवणे पवईकराला चांगलेच महागात पडले आहे. घरकाम करण्याच्या बहाण्याने या महिलेने घरातील अंदाजे ५.८९ लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पवईतील रहेजा विहारमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ नुसार गुन्हा नोंद करत महिलेला अटक केली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेजा […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

साकीनाका परिसरातून १२ लाखाच्या मेफेड्रोनसह दोघांना अटक

मुंबई उपनगरातील साकीनाका परिसरात मेफेड्रोन नामक अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन इसमांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पोलीस त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. तरुणाई नशेच्या विळख्यात अडकून अनेक कुटुंबातील तरुण पिढी अधोगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशावेळी शहरात छुप्या मार्गाने होणाऱ्या नशेखोरीला रोखण्यासाठी […]

Continue Reading 0
no-alcohol-to-minors

अल्पवयीन मुलाला मद्य पुरवठा करणाऱ्या बार वेटर, मॅनेजर विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे येथे नशेत अल्पवयीन मुलाने पोर्शे कार भरधाव चालवत दोन तरुणांना उडवल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणामुळे आता महाराष्ट्रसह मुंबई पोलीस अधिक सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी तपासण्या आणि धाडसत्र सुरु असून, पवई परिसरात एक अल्पवयीन मुलाला मद्य पुरवठा करणाऱ्या बार मधील व्यवस्थापक आणि वेटरवर कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोर्शे […]

Continue Reading 0
A security guard was crushed by a dumper at JVLR

जेविएलआरवर सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडले

आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना एका सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. अतुल खरोसे असे या घटनेत मृत पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, याबाबत पवई पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाला अटक केली आहे. कांजूरमार्ग येथील एमएमआरडीए कॉलनीत राहणारे अतुल खरोसे हे पवई येथील एल अँड टी भागात सुरक्षारक्षक […]

Continue Reading 0
2.7 crore was stolen from the house of a senior citizen; police arrested the caretaker

ज्येष्ठ नागरिकाच्या घरात २.७ कोटीचा डल्ला; घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

कुंपणाने शेत खाल्याची म्हण आपण ऐकलीच असेल, मात्र पवईतील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या हिरानंदानी भागात ही म्हण प्रत्यक्षात घडलेली पाहायला मिळाली. एका ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या एका २३ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरी करत हिरे, सोने, चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा २.७ कोटी रुपयांच्या डल्ला मारला. मदतीसाठी ठेवलेल्या महिलेवर विश्वास ठेवत कुटुंबियांनी […]

Continue Reading 0
powai kidnaping

व्यावसायिकाचे अपहरण करून ५ कोटीची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक

पवई स्थित व्यावसायिक भूषण अरोरा यांचे अपहरण करून त्यांच्या परिवाराकडे ५ कोटीची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकत अरोरा यांची सुखरूप सुटका केली आहे. अमोल म्हात्रे (४१), निरंजन सिंग (३२), विधिचंद्र यादव (३१) आणि मोहम्मद सुलेमान (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांवर भादवि कलम ३६४-ए (खंडणीसाठी अपहरण), ३४ अंतर्गत […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

प्रेयसीचा हॉटेलमध्ये खून करणार्‍या प्रियकराला ३ तासात साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रेयसीचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला साकीनाका पोलिसांनी खबर्‍याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ३ तासात अटक केली आहे. शोएब शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास साकीनाका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिकी कोरे यांना एका खबऱ्याने फोन करून त्यांच्या शेजारील एक व्यक्ती संशयास्पद वावरत […]

Continue Reading 0
RTE Sakinaka police laid a trap and seized drugs worth 9 crores

साकीनाका पोलिसांनी सापळा रचून जप्त केले ९ कोटींचे कोकेन अंमलीपदार्थ

साकीनाका परिसरात अंमलीपदार्थ विकण्यासाठी आलेल्या २ परदेशी तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून ९ कोटी रुपयाचे (८८० ग्राम) अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. साकीनाका पोलिसांच्या रात्रपाळी गस्तीवरील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. डॅनियल नायमेक (३८) जोएल अलेजांद्रो वेरा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या नायजेरियन तरुणांची नावे असून, ते दोघेही मुंबईत अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आले होते. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या […]

Continue Reading 0
mumbai-police-dog-leo-sniffs-out-kidnapped-powai-boy-in-few-mins

पवईतून अल्पवयीन मुलाचे अपहरण; मुंबई पोलिसांच्या ‘लिओ’ श्वानाने ३ तासात काढले शोधून

पवईतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलाला मुंबई पोलिसांच्या लियो या प्रशिक्षित पोलिस स्निफर डॉगने (श्वानाने) अवघ्या तीन तासात शोधून काढले. अपहरण झालेल्या ६ वर्षाच्या मुलाच्या पालकांनी मध्यरात्री पवई पोलिसांकडे मदत मागितल्यानंतर परिसरात सीसीटीव्ही नसल्याने पवई पोलिसांनी पोलीस श्वानाची मदत घेत साडेतीन तासात मुलाची सुटका केली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा रात्री घराजवळ खेळत होता. उशिरापर्यंत […]

Continue Reading 0
powai plaza

पवईत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

पवईत मसाज आणि स्पाच्या नावाखाली कुंटणखाना चालवत महिलांना वेश्या व्यवसायाकरिता भाग पाडणाऱ्या स्पावर शुक्रवारी पवई पोलिसांनी छापा टाकत महिलांची सुटका केली आहे. सदर गुन्ह्यात पवई पोलिसांनी स्पाचा चालक, मालक याला अटक केली आहे. सद्दाम सादिक अन्सारी (वय २९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्पा चालक, मालकाचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईमध्ये मसाज […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!