Archive | Crime

mumbai-police-dog-leo-sniffs-out-kidnapped-powai-boy-in-few-mins

पवईतून अल्पवयीन मुलाचे अपहरण; मुंबई पोलिसांच्या ‘लिओ’ श्वानाने ३ तासात काढले शोधून

पवईतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलाला मुंबई पोलिसांच्या लियो या प्रशिक्षित पोलिस स्निफर डॉगने (श्वानाने) अवघ्या तीन तासात शोधून काढले. अपहरण झालेल्या ६ वर्षाच्या मुलाच्या पालकांनी मध्यरात्री पवई पोलिसांकडे मदत मागितल्यानंतर परिसरात सीसीटीव्ही नसल्याने पवई पोलिसांनी पोलीस श्वानाची मदत घेत साडेतीन तासात मुलाची सुटका केली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा रात्री घराजवळ खेळत होता. उशिरापर्यंत […]

Continue Reading 0
powai plaza

पवईत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

पवईत मसाज आणि स्पाच्या नावाखाली कुंटणखाना चालवत महिलांना वेश्या व्यवसायाकरिता भाग पाडणाऱ्या स्पावर शुक्रवारी पवई पोलिसांनी छापा टाकत महिलांची सुटका केली आहे. सदर गुन्ह्यात पवई पोलिसांनी स्पाचा चालक, मालक याला अटक केली आहे. सद्दाम सादिक अन्सारी (वय २९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्पा चालक, मालकाचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईमध्ये मसाज […]

Continue Reading 0
Drugs bust; NCB arrests man from Powai

₹ ६.६३ लाखाच्या शर्ट चोरी प्रकरणात १० महिन्यांच्या शोधानंतर एकाला अटक

₹ ६.६३ लाखाचे शर्ट चोरीच्या गुन्ह्यात दहा महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला अखेर साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. रिझवान अरमान हाश्मी उर्फ रिझवान इंद्रीसी साकीनाका असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन कंपन्यांना डिलिव्हरीसाठी दिलेले ६.६३,००० रुपये किंमतीचे १०,५०६ रेडीमेड शर्ट चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गोरेगाव परिसरात राहणारे मोहम्मद खान यांचा साकीनाका परिसरात कपड्यांचा कारखाना […]

Continue Reading 0
fake police officer

पवईत तोतया पोलीस अधिकाऱ्याला गांजा पिताना अटक

पवई परिसरात पवई पोलिसांचे दहशतवाद विरोधी सेल (एटीएस) पथक गस्त घालत असताना पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याच्याकडे पोलीस उपनिरीक्षकाचे बनावट ओळखपत्र पोलिसांना मिळून आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपी अभय रामचंद्र पेडणेकर (४१) याला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांचे एटीएस पथक हे […]

Continue Reading 0
Drugs bust; NCB arrests man from Powai

पवईत ९० ग्राम एमडी ड्रगसोबत ३ जणांना अटक

पवई परिसरात एमडी ड्रग्स विक्री – खरेदीसाठी आलेल्या ३ लोकांना बेड्या ठोकत, नशेचा बाजार करणाऱ्या टोळीच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पवई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी सेलने मंगळवार, ५ सप्टेंबरला ही कारवाई केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी ९० ग्राम एमडी ड्रग्स हस्तगत केले आहेत. या ड्रग्सची बाजारात अंदाजे किमत ४.५ लाख […]

Continue Reading 0
Powai, housekeeping worker entered the flat and slit the air hostess girl's throat

पवईत सफाई कर्मचाऱ्याने फ्लॅटमध्ये घुसून चिरला तरुणीचा गळा

पवईत राहणाऱ्या २३ वर्षीय प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेस तरुणीची त्याच इमारतीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी पवईमध्ये घडली. या संदर्भात पवई पोलिसांनी आरोपी सफाई कर्मचारी विक्रम अटवाल (३५) याला १० तासाच्या आत अटक केली आहे. मूळची रायपुरची असणारी आणि प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेस रुपल ओगरे आपल्या मोठ्या बहिणीसह पवईतील, अशोकनगर भागातील एन […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत एअर हॉस्टेसची बाथरूममध्ये गळा चिरून हत्या

पवईतील अशोक नगर भागात राहणाऱ्या एका २३ वर्षीय हवाई सुंदरीची (एअर हॉस्टेस) हत्या झाल्याची एक धक्कादायक घटना पवईत समोर आली आहे. घराच्या बाथरूममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत ती पोलिसांना मिळून आली. तिच्यासोबत राहणारी बहिण गावी गेली असताना हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरु […]

Continue Reading 0
mobile chor

महिला पोलिस अधिकारी सापडली मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये

मोबाईल चोराला पकडण्यासाठी पोहचलेल्या पोलीस पथकाला एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये आढळून आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. खेरवाडी ते विलेपार्ले दरम्यानच्या परिसरात ५ ऑगस्टला तासाभरात सात मोबाईल चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार घडला होता. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हे सातही मोबाईल चोरले […]

Continue Reading 0
Spider gang arrested for House breaking in Hiranandani, Powai

हिरानंदानीत घरफोडी करणाऱ्या स्पायडर टोळीला अटक

पवईतील हिरानंदानी भागात इमारतीच्या पाईपवरून चढून घरात प्रवेश करत चोरी करणाऱ्या स्पायडर टोळीला अवघ्या आठवड्याभरात पकडण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या टोळीच्या अटकेमुळे पवईसह मुंबईतील विविध भागातील घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. अदनान मोहंमद हुसैन खान (वय २० वर्षे), भावेश उर्फ लालु प्रभाकर सिंग चौहान (वय २८ वर्षे) अशी अटक केलेल्या […]

Continue Reading 0
Chain snatcher installed a CCTV to alert him about police, arrested

पोलिसांपासून वाचण्यासाठी सोनसाखळी चोराने लावले सीसीटीव्ही; अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

गुन्हा केल्यानंतर फैजलने आपली स्पोर्ट्स बाईक पवई येथे सोडून दिली होती. जवळपास एक वर्ष आणि चार महिने प्रयत्न केल्यानंतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यांनी त्याच्या मागे पथके लावली होती पण तो कधीच घरात मिळून येत नव्हता. त्याला पकडल्यामुळे पोलिसांना त्याचे एवढे दिवस न पकडले जाण्याचे रहस्य […]

Continue Reading 0
mobile theft

चोरीचे मोबाईल विकणाऱ्या चौघांना अटक

मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये साकीनाका पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून सुमारे ५,१०,००० रुपये किंमतीचे ४६ चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. इम्रान अकबर अली सय्यद (वय ३५, राहणार पवई), दिपक रतनलाल जैस्वाल (वय ३१, रा. पालघर), सुभाष रामपालत बिंद (वय ३४, रा. विक्रोळी) आणि अतिक-उर रहमान चौधरी (वय ४१, रा […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

चांदिवलीत तरुणीची गळा चिरून हत्या

चांदिवली येथील खैरानी रोडवर भर रस्त्यात एका तरुणाने ३० वर्षीय तरुणीची चाकूने गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. तरुणी ही संघर्षनगर येथील रहिवाशी असून, दोघे रिक्षाने प्रवास करत असताना ही घटना घडली. तरुणीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पलायन केलेल्या तरुणाने स्वतःवर देखील चाकूने वार करत स्वतःला जखमी करून घेतले आहे. […]

Continue Reading 0
Drugs bust; NCB arrests man from Powai

निर्यातदार भासवून मासे विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला सुरतमधून अटक

आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा आणि पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. या भामट्याचे आणखी नऊ बळी शोधण्यात साकीनाका पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. मासे निर्यातदार असल्याचे भासवून मुंबई, महाराष्ट्रसह आंध्र प्रदेशातील अनेक मासळी विक्रेत्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून एका ४१ वर्षीय व्यक्तीला साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल ४ […]

Continue Reading 0
arrested

मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

बेरोजगार अनेक तरुण-तरुणी नोकरी मिळवण्यासाठी पैसे देवून नोकरी मिळवण्यास तयार आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत मर्चंट नेव्हीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये सराईत गुन्हेगारांनी शेकडो तरुणांची फसवणूक केली आहे. अशाच एका टोळीला बेड्या ठोकण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी दिल्लीमधून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून तरुणांचे […]

Continue Reading 0
21-year-old-arrested-in-sil

गाड्यांचे सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक; २.७ लाखाचे सायलेंसर हस्तगत

मुंबईच्या विविध भागात मोटारसायकली सोबतच रस्त्यावर पार्क गाड्यांचे सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीने धुडगूस घातला आहे. अशाच दोन घटना पवई परिसरात घडल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करताना पवई पोलिसांनी सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्यांपैकी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. मुसाहीद हजरत अली खान (वय २१ वर्षे) राहणार कालिना सांताक्रूझ असे अटक […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!