शिकवणीसाठी गेलेल्या मुलीवर अत्याचार; धक्कादायक घटनेने पवई हादरली

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील चाळसदृश्य वसाहतीत राहणाऱ्या आणि शिकवणीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी पोस्को आणि भादवि कलमानुसार गुन्हा नोंद करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई परिसरातील आयआयटी भागात असणाऱ्या एका चाळसदृश्य वस्तीत राहणारी ११ वर्षीय मुलगी नेहमी प्रमाणे शिकवणीसाठी संध्याकाळच्या वेळेस आपल्या परिसरात असणाऱ्या एका शिकवणीत गेली होती. ती घरी परतली तेव्हा थोडी उदास वाटल्याने तिला आईने कारण विचारले असता, तिने आईला आपल्या सोबत अत्याचार झाल्याचे सांगतानाच शिकवणीत घडला सगळा प्रकार सांगितला.

“मुलीच्या आईने यासंदर्भात दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आम्ही भादवि कलम ३७७ (अनैसर्गिक कृत्य) आणि पोस्को कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही आरोपीला अटक केली असून, त्याने अजूनही कोणत्या मुलीशी असे गैरकृत्य केले आहे का? याचा तपास करत आहोत.”

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!