पवई तलाव परिसरात नशा करणाऱ्या, अश्लील वर्तन करणाऱ्या, गैरप्रकार करणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पवई पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. पवई तलाव भागात चालणारे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी पवई पोलिसांनी आता ठोस पाऊले उचलली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पवई तलाव भागात दररोज पायी गस्त घालण्यात येत आहे. यावेळी तलाव भागात गैरप्रकार, […]
Archive | Powai News
५० हजार मातीच्या पणत्यांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मोझेक पोर्ट्रेट
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पवईकर मोझेक पोर्ट्रेट कलाकार चेतन राऊत याने ५०,००० मातीच्या पणत्यापासून ४० फूट बाय ३० फूट आकाराचे पोर्ट्रेट साकारत त्यांना मानवंदना दिली आहे. तीन दिवस ठाणे येथील तलाव पाली येथील शिवाजी महाराज मैदानात हे मोझेक पोर्ट्रेट पाहता येणार आहे. १९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या […]
FIR registered against Powai woman for violating quarantine rules
A case has been registered against a woman living at Lake Home complex in Powai for violating quarantine rules made to prevent the spread of the corona epidemic. The case was registered on Thursday after a complaint was lodged by Dr. Hiraman Mahangade, assistant medical officer of the BMC ‘L’ ward. The apartment floor had been […]
अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पवईत महिलेविरूद्ध गुन्हा दाखल
कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी असणाऱ्या अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पवईतील लेकहोम येथे राहणाऱ्या एका महिले विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पालिका असिस्टंट मेडिकल ऑफिसर डॉ हिरामण महांगडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने माळा सिल करून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून, वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर […]
‘Crocodile Safari’ at Powai Lake: Aditya Thackeray talks with municipal officials
On Wednesday, February 17 Tourism and Environment Minister Aditya Thackeray discussed the ‘Crocodile Safari’ project at Powai Lake with senior officials of the Mumbai municipal corporation (BMC). Along with Aditya Thackeray, Transport Minister Anil Parab, MLA Ramesh Korgaonkar, Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal, corporators and concerned officials were also present in the meeting. A meeting was held on 17 […]
सदानंद रावराणे सर यांना शिक्षक भारती संघटनेतर्फे उत्कृष्ठ संस्था चालक पुरस्कार प्रदान
पवईमधील दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणारे मिलिंद विद्यालयाचे संस्थापक सदानंद रावराणे सर यांना शिक्षक भारती संघटनेतर्फे ‘उत्कृष्ठ संस्था चालक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी व मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार मा. श्री. कपिल पाटील व इतर मान्यवर […]
पवई तलाव येथे ‘क्रोकोडाईल सफारी’ सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरेंची पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा
पवई तलावात विचाराधीन असणाऱ्या ‘क्रोकोडाईल सफारी’ प्रकल्पावर आज, बुधवार १७ फेब्रुवारीला पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब, आमदार रमेश कोरगावकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगरसेवक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. आज बृहनमुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ ६मधील ‘एस’ वॉर्डातील चालू तसेच […]
राम मंदिराच्या उभारणीसाठी पवईमध्ये उभा केला जातोय निधी
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्या देशभरातून निधी संकलन सुरू आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. सोबतच संघ परिवारातील संघटनांकडूनही निधी गोळा केला जात आहे. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते मान्यवरांपर्यंत सर्वच जण यात योगदान देत असून, या पार्श्वभूमीवर पवईतील स्वयंसेवक सुद्धा पुढे सरसावले आहेत. आपल्या घरासह आपल्या परिसरात […]
पवईतील युवकांना रोजगार निर्मिती प्रशिक्षणाची सुवर्ण संधी
पवईतील युवकांना एक आनंदाची बातमी आहे. युवकांसाठी रोजगार निर्मिती प्रशिक्षणाची सुवर्ण संधी चालून आली आहे. माजी नगरसेवक चंदन चि. शर्मा यांच्या संकल्पनेतून शनिवार आणि रविवार या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये मोबाईल दुरुस्ती आणि इलेक्ट्रिक दुरुस्ती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षणा अभावी वंचित राहिलेल्या युवकांना स्वतःच्या कलेनुसार व्यवसाय करता यावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. […]
आमदार फंडातून रमाबाई नगर येथील सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण
पवई, आयआयटी मेनगेट समोरील रमाबाई आंबेडकर नगर येथील ज्ञान मंदिर शाळेजवळ १६ सीटच्या सार्वजनिक शौचालयाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. आमदार सुनीलभाऊ राऊत यांच्या आमदार निधीतून व शाखाप्रमुख श्री सचिन मदने यांच्या प्रयत्नाने हे काम करण्यात येत आहे. यावेळी आमदार सुनीलभाऊ राऊत यांच्यासह शाखा प्रमुख सचिन मदने, उपशाखाप्रमुख गणेश सातवे, शिवसैनिक, […]