जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४
प्रशांत शर्मा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स’
अनेक संस्थांचे विश्वस्त आणि प्रख्यात बांधकाम व्यावसायिक प्रशांत शर्मा यांना शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स २०२२’ प्रदान करण्यात आला आहे. ३ सप्टेंबरला राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. प्रशांत शर्मा यांना हा पुरस्कार त्यांच्याद्वारे चालवल्या जाणार्या अनेक संस्थांचे विश्वस्त या नात्याने शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अग्रेसर योगदानासाठी […]
Powai Sharadotsav, Festival with a Purpose turns 10
PRESS RELEASE Powai Sharadotsav, Festival with a Purpose, has been at the forefront of all good things the Festival of Durga Puja signifies and many Initiatives much beyond the festival. Brought to Powai by Spandan Foundation, this has been an event people look forward to with great anticipation every year. It is the first theme-based […]
पवई चैतन्यनगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग
@प्रतिक कांबळे पवईमधील चैतन्यनगर येथील चाळसदृश परिसरात चाळींच्या घराबाहेर लावलेल्या घरगुती मिटर बॉक्सला आग लागल्याची घटना, गुरुवार १५ सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या मदतीने काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली. अदानी कंपनीचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची तपासणी केल्यानंतर ही आग शॉर्ट सर्किटमुळे […]
आदित्य ठाकरेंनी घेतले चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज, गुरुवार ०८ सप्टेंबरला चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत माजी परिवहन मंत्री अनिल परब, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, युवासेना विभाग अधिकारी बालाजी सांगळे आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी संघटना मजबूत करत तिला वाढवण्यासाठी […]
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते सोमवारी पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करण्यात आले. शाह यांच्यासमवेत उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपस्थित होते. मंत्र्यांचे स्वागत करताना शाळेचे संस्थापक श्री. नाईक म्हणाले की, “शाळेची स्थापना प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि नवीन पिढीमध्ये राष्ट्रीय […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले हिरानंदानीच्या महाराजाचे दर्शन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरानंदानीच्या महाराजाचे दर्शन घेतले. रिद्धी सिद्धी महिला मंडळाच्यावतीने नवीन हिरानंदानी स्कूल येथील गोपीनाथ मुंडे मैदानात आयोजित गणेशोत्सवास मंगळवारी रात्री भेट देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बाप्पांचे दर्शन घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावर्षी दोन वर्षांनंतर […]
दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे गुरुवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. परंतु पाठीमागील २ वर्ष कोरोनाच्या संकटामुळे […]
एस एम शेट्टी इंटरनॅशनल स्कूलतर्फे ‘अमलगाम’, हवामान बदल स्पर्धेचे आयोजन
बंट संघाच्या एस एम शेट्टी शैक्षणिक संस्थांच्या वर्षभर चाललेल्या रौप्यमहोत्सवी उत्सवाचा एक भाग म्हणून, इंटरनॅशनल स्कूलने शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी अवर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या आर एन शेट्टी इनडोअर सभागृहात राज्य मंडळ आणि आंतरराष्ट्रीय शाळा यांच्यातील स्पर्धांची मालिका आयोजित केली होती. यावेळी अमलगम नामक हवामान बदल केंद्रीय थीमवर आधारित स्पर्धा होती. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ८ वेगवेगळ्या […]
लग्नास टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराचा गळा आवळून खून
आपल्या प्रियकरासोबत पवईमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. झोरा शाह (३२) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती गेल्या वर्षाभरापासून रमजान शेख या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. तिने आपल्या प्रियकराकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो सातत्यानं टाळाटाळ करत असल्याने महिलेने हे टोकाचे पाऊस उचलले. त्यानंतर […]
एटीएम कार्डाची अदलाबदली करून करायचा फसवणूक; पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १३० एटीएम कार्ड जप्त
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तुफेल अहमद लाल मिया सिद्दिकी (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पवई पोलिसांनी त्याच्याकडून विविध बँकांची १३० एटीएम कार्ड सह एक बजाज पल्सर मोटरसाकल हस्तगत केले आहेत. पवईत राहणारा रोशन कुमार […]
पवईत आयुष्य फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी रक्तदान
@अविनाश हजारे पवई येथील आयुष्य फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पवईच्या माता रमाबाई आंबेडकर नगर ग्रुप नं. २ येथील विश्वशांती बुद्ध विहारमध्ये आयोजित केलेल्या शिबिरात तरुणांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या शिबिरात तब्बल २७४ रक्तदात्यांनी रक्तदान करत एक नवा विक्रम केला आहे. दिवंगत […]
आला रे आला गोविंदा आला; पवईत कोरोनामुक्त दहीहंडी
कोरोनाने देशभर थैमान घातल्याने पाठ्मागील दोन वर्ष दहीकाला उत्सवावर असणारे कोरोनाचे सावट पाहता उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मात्र आता कोरोनावर मात करत सर्व सुरळीत झाल्याने प्रशासनाने सर्व निर्बंध हटवले असून, यावर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात दहीकाला उत्सव देशभर साजरा करण्यात आला. मुंबईसह देशभर प्रत्येकवर्षी मोठा आकर्षक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मुंबई, ठाणे येथील […]
पवई विहार कॉम्प्लेक्स रोडच्या कामाला सुरुवात; रस्ता वाहतूकीसाठी बंद
पाठीमागील अनेक वर्ष दुरावस्थेत असलेल्या पवई विहार कॉम्प्लेक्सच्या अंतर्गत रोडच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आवर्तन पवईने याबाबत पालिका आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. गेल्या आठवड्यात ‘पवई विहारचा रस्ता खड्यात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल’ अशा मथळ्याखाली बातमी करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले होते. खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे […]
आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत तरुणींची फसवणूक, भामट्याला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत लग्न जुळवणाऱ्या साईटवर तरुणींशी ओळख वाढवून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या आहेत. अभिजीत परमेश्वर गाढवे (२६) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घाटकोपर येथून अभिजीतला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण यांची काही दिवसांपूर्वी एका मॅट्रीमोनी साईटवर […]
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात तरुणीला अटक; भंगारात मिळाली मोटारसायकल
मोटारसायकल चोरी म्हणजे पुरुषाचा सहभाग असा समज आहे. पवई येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मात्र या उलट घडले आहे. पवई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पवई पोलिसांनी देवनार डम्पिंग ग्राउंड येथून तिने चोरी केलेली गाडी हस्तगत केली आहे. २६ वर्षीय तक्रारदार किरण पठाडे हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम […]
२.८३ लाखाच्या मोबाईलची चोरी; तडीपार आरोपीला ४ तासात बेड्या
पवई पोलीस ठाणेसह मुंबईच्या हद्दीतून तडीपार असतानाही परिसरात येवून २.८३ लाखाचे मोबाईल चोरी करून पोबारा केलेल्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुन्ह्याच्या ४ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. सुरेश दत्ता काकडे (वय २८ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी निशा दास या शुक्रवार, ०८ जुलैला झोपेत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरात रात्री […]