पवईतील एसएमशेट्टी शाळेजवळ असणाऱ्या आयआयटी स्टाफ कॉर्टर्समध्ये रविवार, ३ मे रोजी अजून एका कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. पवईतील एका नामांकित रुग्णालयात तो काम करत आहे. यासोबतच येथील बाधितांची संख्या दोन झाली असून, पूर्वी पॉझिटिव्ह मिळून आलेला तरुण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.
पवईतील कोरोना बाधितांचा आकडा शनिवार, २ मे पर्यंत ४५ वर पोहचला होता. रविवार, ३ मे रोजी एका दिवसात यात ८ रुग्णांची भर पडली असून, रविवार संध्याकाळपर्यंत हा आकडा ५३ वर पोहचला आहे. रविवारी मिळालेल्या बाधितांमध्ये आयआयटी पवई येथील फुलेनगरमध्ये ६, एलएंडटी जवळील भागात १ तर आयआयटी स्टाफ कॉर्टर्समध्ये १ अशा ८ बाधितांची वाढ झाली आहे.
आयआयटी स्टाफ कॉर्टर्समध्ये मिळून आलेला बाधित हा पवईतील एका नामांकित रुग्णालयाचा कर्मचारी आहे. आपल्या परिवारासोबत तो येथील एका इमारतीत राहतो. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या परिवारातील सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी पालिका अधिकाऱ्यांनी पुष्टी केली.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.