हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख

अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे.

पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक यांना १.९५ लाखाचा गंडा घातला आहे.तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक यांना १.९५ लाखाचा गंडा घातला आहे. याबाबत जवळपास एक महिन्यानंतर माहिती पडताच ज्येष्ठ नागरिकाने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ज्येष्ठ नागरिकाचे पेन्शन खाते सुरक्षित करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. पेन्शन खाते बंद होईल या भीतीने समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवत ओटीपी शेअर केल्यामुळे पेन्शनधारकाला आपली खात्यातील रक्कम गमवावी लागली.

८१ वर्षीय निवृत्त ज्येष्ठ नागरिक हे आपल्या पत्नीसोबत पवईतील हिरानंदानी गार्डन्स येथे राहतात. एका सरकारी बँकेच्या पवई शाखेत त्यांचे निवृत्तीवेतन खाते आहे. २ जून रोजी त्यांना एका इसमाचा फोन आला होता. त्या इसमाने आपली ओळख दिपक मिश्रा म्हणून करून देत आपण बँक कर्मचारी असल्याचे ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. तो पुढे म्हणाला की, तुम्ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तुमचे निवृत्तीवेतन खाते निलंबित केले जाईल आणि त्यानंतर कोणतेही पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचे निवृत्तीवेतन खाते सुरक्षित करणे आवश्यक आहे.

ओटीपी शेअर केला

निवृत्तीवेतन हेच त्या जोडप्याचे उत्पन्नाचे साधन असल्याने त्यांनी त्यास दुजारा देत काय करावे लागले अशी विचारणा केली. ज्यानंतर मिश्रा याने त्यांना खाते आणि डेबिट कार्डचे तपशील विचारले. “त्यांची वैयक्तिक खाजगी माहिती सामायिक केल्यावर, ज्येष्ठ नागरिकाला वेगवेगळ्या पाच ओटीपी प्राप्त झाल्या ज्या त्यांनी मिश्रा याला आपले खाते सुरक्षित करण्यासाठी सांगितल्या,” असे पोलिसांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

२९ जून रोजी पेन्शनधारक आपले पासबुक अद्ययावत करण्यासाठी बँकेच्या शाखेत गेले तेव्हा त्यांच्या खात्यातून १.९५ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे पाहून धक्काच बसला. याबाबत त्यांनी तातडीने बँक अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांची फसवणूक झाले असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी ४ जुलै रोजी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

“मिश्रा सोबत तक्रारदार यांच्या सुरु असणाऱ्या संभाषणाच्यावेळी त्यांना बँकेकडून अनेक संदेश प्राप्त झाले होते. मात्र ते मार्केटिंग संदेश असावेत असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि विविध ५ व्यवहाराच्या माध्यमातून सायबर चोरट्यांना त्यांच्या खात्यातून १.९५ लाख लांबवण्यात यश आले,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

“आम्ही नागरिकांना नियमित सूचना देत असतो कि कोणत्याही अनोळखी फोनवर विश्वास ठेवून त्याला आपली खाजगी माहिती देवू नका. बँकेत जावून किंवा फोन करून त्याची खात्री करून घ्या. बँक सुद्धा याबाबत जनजागृती करत असते तरीही नागरिक अशा फसवणुकीला बळी पडत आहेत’ असेही याबाबत बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिश्रा या नावाने ज्या नंबरवरून कॉल केला होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. अज्ञात आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा नोंद करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

#powai #onlinecheating #phishing #seniorcitizen #powainews

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!