पवईमध्ये मुंबईतील पहिले झीरो वेस्ट रनचे आयोजन

ब्रूकफील्ड प्रॉपर्टीज, द रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या सहयोगाने पवईमध्ये ‘११व्या पवई रन’चे आयोजन करण्यात आले होते. हे मुंबईतील पहिले झीरो वेस्ट रनचे आयोजन होते. #BreakThePlasticHabitला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच शून्य कचरा वातावरणात आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या प्रमुख उद्देशाने ही ४ किमी अंतराची मॅरेथॉन घेण्यात आली. २००० पेक्षा जास्त व्यक्तींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि १५० पेक्षा जास्त सीएक्सओ #BreakThePlasticHabitच्या समर्थनार्थ धावले.

सीएक्सओ रनला श्री अंकुर गुप्ता (व्यवस्थापकीय भागीदार आणि रिअल इस्टेट इंडिया आणि मिडल ईस्टचे प्रमुख, कंट्री हेड – इंडिया, ब्रूकफील्ड अॅसेट मॅनेजमेंट) यांनी हिरवा झेंडा दाखवला. तर कम्युनिटी-रनला श्री विठ्ठल सूर्यवंशी (वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रादेशिक प्रमुख – पश्चिम, ब्रुकफील्ड प्रॉपर्टीएस) यांनी हिरवा झेंडा दाखवला.

निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी पवई रनने १९ जून ते २६ जून या काळात १० किमी आणि २१ किमीच्या व्हर्च्युअल रनचे देखील आयोजन केले होते. त्यामध्ये ३०० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. सदृढ जीवनशैलीची आणि सामाजिक कार्याला पाठिंबा देण्याची आवड लोकांमध्ये आहे हे यावरून दिसून येते.

रिसर्कल (ReCircle) या उपक्रमाचे रिसायकलिंग पार्टनर होते. संसाधनांचा अपव्यय होण्याला प्रतिबंध घालून तसेच रिसायकल, पुन्हा उपयोग आणि पुनःनिर्मिती करण्यासाठी रिसर्कल कार्यरत आहे. या शून्य कचरा रनमधून उभारला जाणारा सर्व निधी रोटरी क्लबकडून प्रोत्साहन दिल्या जात असलेल्या विविध परोपकारी व सामाजिक कार्यांसाठी वापरला जाणार आहे.

“द इन्नोव्हेशन रन” निर्माण करण्यासाठी पवईमधील सर्वात जुनी संस्था असणाऱ्या आयआयटी मुंबईच्या सहकार्याने यामध्ये सीएक्सओ आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसोबत धावले. आजच्या आणि भविष्यातील लीडर्सनी या रनला पाठिंबा दर्शवून तिचा उद्देश सफल होण्यात मोलाचे योगदान दिले.

संगीत, खाद्यपदार्थ, आणि मनोरंजन यांची रेलचेल असलेल्या एका कार्निवलने या रनची सांगता झाली, पवईसह, मुंबईकरांच्या सक्रिय व उत्साही सहभागामुळे या संपूर्ण उपक्रमात मौजमजा, तंदुरुस्ती, सामाजिक ऐक्य, सामाजिक कार्य व मनोरंजन यांचा उत्तम मिलाप साधला गेला.

पवई रनबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. आलोक अगरवाल म्हणाले, “ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजमध्ये आम्ही मानतो की, हे जग आपल्या आजच्या आणि पुढील पिढ्यांना राहण्यासाठी अधिक चांगले बनावे यासाठी जे प्रयत्न करणे आवश्यक आहे त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. पवई रनसाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्स आणि आयआयटी मुंबईचा ई-सेल यांच्यासोबत सहकार्य करून आणि या उत्साही, जागरूक, सक्रिय समुदायात सहभागी होऊन आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पवई प्लास्टिक-मुक्त व्हावी या उद्देशाने उचललेले पहिले पाऊल म्हणजे #BreakThePlasticHabit हा विषय घेऊन शून्य कचरा रनचे आयोजन.”

रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सचे दीपक दर्यानानी म्हणाले, “ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजने आम्हाला सहयोग प्रदान केले याबद्दल आम्हाला आनंद होत आहे आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. ब्रूकफील्ड प्रॉपर्टीजच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या पवई रनने एक नवा मापदंड रचला आहे. #BreakThePlasticHabit हा विषय घेऊन मुंबईतील पहिल्या शून्य कचरा रनचे आयोजन करण्यात आल्याने आणि खास म्हणजे पर्यावरण संरक्षण, संवर्धनावर लक्ष केंद्रित करून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याने अधिक हरित भविष्याबद्दल समाज जागृती घडून येण्यात मदत झाली आहे.

, , , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: