रमाबाई आंबेडकर नगर येथील सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण
स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या निधीतून व शाखाप्रमुख सचिन मदने यांच्या प्रयत्नांने माता रमाबाई आंबेडकर नगर -१ येथील १६ सीट सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते पवईकर आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत शुक्रवार ७ मार्च रोजी या शौचालयाचे लोकार्पण पार पडले. पवई हा उच्चभ्रू वस्ती सोबतच चाळ सदृश्य वस्तीचा परिसर म्हणून […]
शिवसेना शाखा १२२तर्फ़े कोरोना योध्यांचा सत्कार
स्थानिक आमदार श्री सुनिलभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा १२२ यांच्यावतीने १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार, अंबुलन्स चालक, स्मशानभूमीतील कामगार आणि समाजसेवी संस्था यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. कोरोना योध्यांना सन्मानपत्र, पीपीई किट व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शाखा १२२ शाखाप्रमुख सचिन मदने व शिवसैनिक उपस्थित […]
रिक्षा चोरीच्या संशयातून पेटवले घर
रिक्षा चोरी केल्याच्या संशयातून रिक्षा मालकांनी ४३ वर्षीय व्यक्तीचे घर जाळल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. याबाबत पवई पोलिस गुन्हा नोंद करून आरोपींना ताब्यात घेवून अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, तो पवईतील फिल्टरपाडा भागात राहतो. पवईसह, साकीनाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. वर्षभरापूर्वी जामीनावर […]
कलाकार चेतन राऊत यांचा मोझॅक पोर्ट्रेटच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना सलाम
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. या संकटात अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. मग ते रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण बरे करणारे डॉक्टर्स, नर्स असो किंवा रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून अक्षरशः २४ -२४ तास बंदोबस्ताला उभे असणारे पोलिस असो किंवा या संकट काळातही समाजाला योग्य माहिती […]
आयआयटी मुंबई देशात पुन्हा नंबर वन
जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी ‘क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग’ नुकतीच जाहीर झाली आहे. या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत पुन्हा बाजी मारत देशातील विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबई नंबर एकवर कायम राहिले आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत १७२ वा क्रमांक मिळवला आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, संस्थेची प्रतिष्ठा, शिक्षक विद्यार्थी सरासरी, शिक्षकांची कामगिरी, परदेशी शिक्षकांची सरासरी, परदेशी विद्यार्थ्यांची सरासरी असे निकष लक्षात घेत […]
केवायसी फसवणूकीत आयआयटीच्या विद्यार्थिनीने गमावले ८६ हजार
पवईस्थित आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी केवायसी फसवणूकीची नवीनतम बळी ठरली आहे. सायबर चोरट्याने केवायसीच्या नावाखाली तिच्या खात्यातून ८६ हजार रुपये उडवले आहेत. यासंदर्भात पवई पोलीस ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. तक्रारदार तरुणी ही पवईतील आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेत आहे. २४ एप्रिलला ती आपल्या कॅम्पसमध्ये असताना तिच्या मोबाईलवर एका […]
अभिनेत्याची ८६ हजाराची ऑनलाईन फसवणूक
३३ वर्षीय मालिका अभिनेता नुकताच नवीन ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला आहे. कर्जाची रक्कम सेटलमेंटच्या नावाखाली सायबर चोरट्याने त्याची ८६ हजाराची फसवणूक केली. ई-वॉलेटच्या माध्यमातून शिल्लक कर्जाची माहिती मिळवत सायबर चोरट्याने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पैसे हस्तांतरित झालेल्या बँकेच्या मालाड येथील शाखेतील खाते गोठवत अधिक तपास करत आहेत. या संदर्भात […]
चार्टर्ड अकाऊंटंटला ४८ हजाराला गंडा
पवईतील एका चार्टर्ड अकाऊंटंटला त्याच्या घरातील वाय-फाय ब्रॉडबँड सेवेसाठी ऑनलाईन केवायसी करण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने ४८ हजार रुपयाला गंडा घातला आहे. सायबर चोरट्याने एक अॅप डाउनलोड करण्यास सांगत तक्रारदार यांच्या फोनचा रिमोट एक्सेस मिळवून प्रत्येकी २४ हजाराच्या दोन व्यवहाराद्वारे पैसे ट्रान्सफर केले. ७ एप्रिल रोजी तक्रारदार यांनी आपल्या घरात ब्रॉडबँड सेवा सुरु केली होती. […]
विनोद पाटील युवा फाऊंडेशनतर्फे पोलिसांना कृतज्ञता अल्पोपहाराचे वाटप
अर्चना सोंडे कोरोनाकाळात पोलीस बांधव २४ तास बंदोबस्तावर आहेत. कोरोनासोबत दोन हात करतानाच नागरिक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत आहेत की नाही हे देखील पाहत आहेत. आपल्या प्राणांची पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ‘विनोद पाटील युवा फाऊंडेशन’तर्फे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना ‘कृतज्ञता अल्पोपहाराचे’ वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात […]
जामिनावर सुटलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसह तिघांना हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक
पवई परिसरातील शिवशक्ती नगर येथील एका साडीच्या दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून, दुकान मालकाला चाकूने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या ४ आरोपींना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीला काही महिन्यांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आले होते. तो खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. २१ एप्रिलला ४ अज्ञात इसम हे […]
जागर मानवतेचा समुहातर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेचा निकाल जाहीर
जगभरात थैमान घातलेला कोरोना वायरसला रोखण्यासाठी उत्सव आणि सण घरीच साजरे करण्याची विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. याचीच दक्षता घेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती आंबेडकरी अनुयायांनी सरकारी आदेशाचे पालन करीत घरीच राहून साजरी केली. जागर मानवतेचा (सुरुवात एका नव्या पर्वाची) या समुहातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डिजिटल पध्दतीने विविध स्पर्धांचे आयोजन […]
पवईत सापडले बिबट्याचे पिल्लू; आईसोबत पाठवण्यासाठी वनाधिकाऱ्यांचे प्रयत्न
पवईतील नॅशनल इस्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (नीटी) परिसरात बिबट्याचे एक पिल्लू आढळून आले आहे. येथील बंद असलेल्या एका गोडाऊनमध्ये हे पिल्लू मिळून आले आहे. त्याची त्याच्या आईसोबत भेट घडवून परत पाठवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव रक्षक प्रयत्न करत असून, पिल्लावर नजर ठेवून आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीला लागून पवईतील बराच परिसर […]
पवईसह पालिका एस विभागात दुपारनंतर मेडिकल स्टोअर वगळता सर्व दुकाने बंद
पालिका एस विभागात दुपारी १२ नंतर अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद करून केवळ होम डिलिव्हरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेडिकल स्टोअरला मात्र यातून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक नियम करत कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, नागरिक अजूनही नियमांची पायमल्ली करत अनावश्यक गर्दी करत असल्याचे प्रकार घडत आहेत. याला […]
मेट्रो ६ प्रकल्प: पवईतील दोन पादचारी पूल हटवण्यास सुरुवात
प्रमोद चव्हाण, गौरव शर्मा स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (पूर्व धृतगती मार्ग) या मार्गावर सुरु असणाऱ्या मेट्रो ६च्या मार्गात येणाऱ्या पवईतील २ पादचारी पुलांना हटवण्याची तयारी सुरु झाली आहे. यामध्ये आयआयटी मार्केट गेट समोरील पादचारी पूल आणि मिलिंदनगर येथील पादचारी पुलाचा समावेश आहे. जेवीएलआर मार्गाच्या निर्मितीवेळी भविष्यात येथून जाणाऱ्या वाहनांच्या संख्या आणि रस्ता क्रॉसिंगला येणाऱ्या अडचणी […]
पवई लायन्स क्लबने दत्तक घेतले आयआयटी मेनगेट समोरील सार्वजनिक शौचालय
डागडुजी आणि अस्वच्छतेमुळे पाठीमागील अनेक महिन्यांपासून खितपत पडलेले आयआयटी मेनगेट जवळील सार्वजनिक शौचालय लायन्स क्लब ऑफ पवईतर्फे दत्तक घेण्यात आले आहे. येथून पुढील काळात त्याच्या डागडुजी आणि स्वच्छतेचे काम संस्था पाहणार आहे. क्लबचे अध्यक्ष कपिलदेव सिंह आणि सदस्य भवानी शंकर शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शौचालय दत्तक घेण्यात आले आहे. नुकतेच शौचालयाचे नूतनीकरण करून ते सार्वजनिक […]
‘लेट्स मेक समर कुल’ अंतर्गत हेल्पिंग हॅन्ड्सतर्फे पवईत वृक्षारोपण मोहीम
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराने महाराष्ट्रात पुन्हा थैमान घालायला सुरुवात केलेली असतानाच किमान निसर्गाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आणि त्याचा समतोल साधण्यासाठी हेल्पिंग हॅन्ड्स फॉर ह्युमॅनिटीतर्फे ‘लेट्स मेक समर कुल’ अंतर्गत पवईत वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे. सोबतच परिसरातील स्वच्छता मोहीम देखील राबवली जात आहे. मार्च महिना संपता संपता आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत उन्हाच्या झळा […]
एज्युकेशन लोनच्या नावाखाली आयटी प्रोफेशनलला एक लाखाचा गंडा
पवईकर आणि आयटी प्रोफेशनल असणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी १.१ लाख रुपयांना ऑनलाईन फसवले आहे. सदर महिला एमबीएमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती शोधत होती. कर्ज घेण्यासाठी आर्थिक संस्थेचा शोध घेत असताना या महिलेने इंटरनेटवर सापडलेल्या नंबरवर संपर्क साधला, परंतु ती तिच्या बचतीतून १.१ लाख रुपये गमावून बसली. या संदर्भात […]
महाराष्ट्र शासनाच्या वन्यजीव रक्षक पदी सुनिष कुंजु यांची निवड
वन्यजीवांबाबत कोणतीही अनधिकृत कृती आम्ही कदापी सहन करणार नाही – सुनिष कुंजु महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील महसूल व वन विभाग यांनी प्राणीमित्र, वन्यप्राणी व पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते सुनिष सुब्रमण्यन कुंजु यांची मानद वन्यजीव रक्षक, मुंबई उपनगर या पदी निवड केली आहे. ही त्यांची दुसऱ्यांदा निवड असून, यापूर्वी त्यांची मानद वन्यजीव रक्षक मुंबई शहर म्हणून निवड करण्यात […]
आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई; कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने निर्णय
पवई स्थित इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबई कॅम्पसमध्ये पाठीमागील काही दिवसात समोर येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या पाहता आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रसार रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कॅम्पस बाहेर सलूनमध्ये जाण्याने हा संसर्ग झाला असण्याची शक्यता येथील पथकाने वर्तवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात […]
पवईत १७ वर्षीय तरुणाचा खून; मारहाणीचा व्हिडीओ केला शूट; आरोपींना ५ तासात अटक
पवईतील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, ३१ मार्चला पहाटे उघडकीस आली होती. अनिकेत रामा बनसोडे असे या तरुणाचे नाव असून, त्याला मारहाण करत त्याचा खून केल्याचे समोर येताच पवई पोलिसांनी पाच तासात ४ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपी जेविएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम […]

