पोलीस नाईक बावधने यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह – वैद्यकीय अधिकारी

पोलीस नाईक बावधने यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह – वैद्यकीय अधिकारी

पोलीस नाईक बावधने पवई परिसरात कर्तव्य बजावत असताना छायाचित्रकार रमेश कांबळे यांनी टिपलेले त्यांचे छायाचित्र.

पवई पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणारे पोलीस नाईक धोंडीबा जाणू बावधने (४८ वर्षे) यांचे राजावाडी रुग्णालयात २० एप्रिल रोजी निधन झाले होते. हा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची माहिती सोशल माध्यमांसह काही माध्यमांनी प्रसारित केली होती. मात्र, बावधने यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याचे डॉ. विद्या ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय यांनी सांगितले.

घाटकोपर येथील भटवाडी भागात राहणारे बावधने पवई पोलीस ठाणेमधील मोबाईल व्हॅन ३ वर चालक म्हणून कार्यरत होते. त्यांना सर्दी खोकला जाणवत असल्याने १५ एप्रिलपासून ते रुग्ण निवेदनात जात उपचार घेत होते. त्यांचा त्रास कमी होत नसल्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल होण्याची सूचना डॉक्टरांकडून केली होती.

राजावाडी रुग्णालय येथे उपचार सुरु असताना २० एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर विविध माध्यमांमधून त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची माहिती पसरवण्यात आली होती. यामुळे पोलीस दलात निराशा आणि भीतीचे वातावरण पसरले होते.

त्याच रात्री स्वाब नमुने घेऊन तपासणीसाठी देण्यात आले होते.‌ त्याचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले.” – डॉ. विद्या ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय.‌

कोरोना अहवाल निगेटिव्ह

राजावाडी रुग्णालयाच्या या अहवालानंतर पोलीस खात्याने सुटकेचा निश्वास टाकला आहे. “बावधने एक चांगले पोलीस कर्मचारी होते. नेहमी आपल्या कामात तत्पर असायचे. त्यांचा वैद्यकीय अहवाल आला आहे, त्यांच्यात कोविड -१९ अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यासाठी मीडियाने घाई केली. हे केवळ चुकीचेच नाही तर बेजबाबदारपणाचे देखील आहे. मी आग्रह करतो की माध्यमांमधील पत्रकारांनी बातमी प्रकाशित करण्यापूर्वी त्याची योग्य माहिती मिळवावी. विशेषत: यासारख्या गंभीर विषयावर,” असे याबाबत बोलताना साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, मिलिंद खेतले यांनी सांगितले.

“बावधने यांचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

“खोट्या बातम्या पसरवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांना विनंती करतो की, कोणत्याही माहितीची खात्री केल्याशिवाय ती माहिती प्रसारित करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते” असेही याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!