कोरोना बाधितांच्या संख्येने मुंबई महानगरपालिका एस विभागात उच्चांक गाठला असतानाच पवईकरांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे. पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरात ३० जून आणि १ जुलै या दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात ३० जून रोजी एक तर १ जुलै रोजी ३ बाधितांची नोंद झाली आहे.
कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या मुंबईकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अनलॉक सुरु झाल्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, अजूनही वाढण्याची भीती सुद्धा आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे पालिका एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या स्थानावर पोहचला आहे. २८ जूनच्या आकडेवारीनुसार पालिका ‘एस’ विभागात ४२४० बाधितांची नोंद झाली असून, त्यातील २२४८ बाधितांना घरी सोडण्यात आले असून, १७१७ बाधितांवर उपचार सुरु होते.
पालिका एस विभागात मोठ्या प्रमाणात बाधित मिळू लागल्याने ५ जुलै पर्यंत येथील काही भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकानांना बंद करण्यात आले आहे. या बंद करण्यात आलेल्या परिसरातून पवईची मात्र सुटका झाली आहे. पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरात मंगळवार ३० जून आणि बुधवार १ जुलै रोजी ४ बाधितांची नोंद झाली आहे.
मंगळवार ३० जून रोजी तिरंदाज व्हिलेज येथील ३९ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. तर बुधवार १ जुलै रोजी पद्मावती रोडवरील एका इमारतीत ३१ वर्षीय महिला, हरेक्रिष्णा रोडवर ५३ वर्षीय महिला आणि ६४ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.