ऑनलाईन दारु मागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला ८२ हजारांची टोपी

ऑनलाईन दारु मागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला ८२ हजारांची टोपी‘अनलॉक १’ मध्ये काही दुकाने आणि व्यवसाय चालू झाली असली तरीही काही दुकानांना उघडण्यास अद्याप  बंदी करण्यात आली आहे. या काळात एका बँक कर्मचाऱ्याला ऑनलाईन दारु मागवणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स दिल्यामुळे खात्यातून चोरट्यांनी ८२ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबवत त्याला टोपी घातली आहे. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच दारु ऑनलाईन विक्रीला मान्यता दिली आहे.

कोरोना विषाणूनी देश, राष्ट्रासह मुंबई शहरात धुमाकूळ घातला आहे. याचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र यामुळे ऑनलाईन व्यवहारात झालेल्या वाढीचा फायदा घेत सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून पवईतील एका वृद्धाला १. ८ लाखाच्या फसवणुकीला सामोरे जावे लागल्याच्या घटनेला काही दिवसच उलटले असतील कि, एका बँक कर्मचाऱ्याची सुद्धा सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पवईतील रहेजा विहार येथे राहणाऱ्या एका रहिवाशाने पवईत कुठले शॉप ऑनलाईन दारू विक्री करते का याची माहिती सर्च केली होती. यावेळी त्याला येथील एक नामांकित दुकान अशी विक्री करत असल्याचे दाखवताच त्याने तिथे दिलेल्या नंबरवर फोन करून ४५०० रुपये किंमतीची दारू मागवली.

ऑर्डर देताच समोरील व्यक्तीने या कर्मचाऱ्याला ऑनलाईन पेमेंट करायला सांगितले. तक्रारदार याने क्रेडीट कार्डची माहिती देत आलेला ओटीपी नंबर शेअर करताच त्याच्या खात्यातून अंदाजे ८२ हजार निघाले,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा: वृद्ध दाम्पत्याला दिलासा

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपले कार्ड तात्काळ ब्लॉक करत याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

“अनेकदा मुंबई पोलीस, बँक आपल्या बँकेचे खात्याचे किंवा कार्डचे डिटेल्स कोणासोबतही शेअर करु नका असे वारंवार सांगूनही लोक याला बळी पडत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित लोक सुद्धा याला बळी पडत आहेत,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले.

या कर्मचाऱ्याने बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुन आपले कार्ड ब्लॉक केले, ज्यामुळे या कर्मचाऱ्याचे ३९ हजार ५०० रुपये वाचले. पवई पोलिस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Trackbacks/Pingbacks

  1. मेडिकल स्टोअर मालकाची ऑनलाईन फसवणूक » आवर्तन पवई - July 3, 2020

    […] हे वाचले का? – प्रेम आणि आठवणीत चिंब क… […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!