पवई तलाव भरला, धरण भागात कडेकोट बंदोबस्त

powai lake dam overflowगेल्या आठवडाभर पडलेल्या पावसामुळे पवई तलाव भरला असून, मुंबईकरांचे आकर्षण असणारे पवई तलाव धरण ओसंडून वाहू लागले आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी तलाव भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच या भागात मुंबईकरांनी गर्दी केली होती.

आठवडाभर मुंबईला पावसाने झोडपले आहे. तलाव क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत, शुक्रवारी संध्याकाळ पासून पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. ऑगस्ट महिन्यात भरून वाहणारा तलाव जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच भरल्याने मुंबईकरांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शनिवार – रविवार गाठूनच तलाव ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांची येथे येणारी गर्दी पाहता शनिवारी सकाळपासूनच धरण भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याट आला आहे. लोकांना धबधब्याजवळ जाण्यास मनाई केली जात आहे.

३ ते ७ जुलै पर्यंत भरतीचा काळ असल्याचे मुंबई विभागाच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात येत असल्यामुळे अजून काही काळ तरी लोकांना पवई तलाव धरण भागात पावसाचा आनंद लुटावयास मिळणार आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!