पवईत अजगर चढले ५ माळे; पाऊज मुंबईने केली सुटका

पवईतील रामबाग येथील जलतरंग इमारतीच्या चक्क ५व्या मजल्यावरील घराच्या खिडकीत अजगर पोहचल्याची घटना बुधवार, २१ सप्टेंबर रोजी समोर आली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. अम्मा केअर फाउंडेशन (ACF) आणि प्लांट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी-मुंबई (PAWS-Mumbai) स्वयंसेवक भूषण साळवे आणि धीरज फोडकर यांनी खिडकीतील या ४ फूट लांब अजगराची (इंडियन रॉक पायथन) सुटका केली.

पाऊज मुंबई हेल्पलाइन ९८३३४ ८०३८८वर सतर्क रहिवाशी डॉ. विजय बघेल यांनी फोन करून त्यांच्या पवई पोलीस ठाण्याजवळील जलतरंग सोसायटीतील ५व्या मजल्यावरील घराच्या खिडकीत एक अजगर असून, त्याच्या बचावासाठी मदत मागितली होती.

माहिती मिळताच अम्मा केअर फाउंडेशन आणि प्लांट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी-मुंबई स्वयंसेवक भूषण आणि धीरज यांनी तिथे जात खिडकीत अडकून पडलेल्या अजगराची सुटका केली.

“अजगर किंवा कोणताही साप हा एवढ्या उंचावर चढणे टाळतो. क्वचित प्रसंगी धामन इमारतीच्या वरील भागापर्यंत गेल्याचे आढळते. पवई येथे आढळून आलेले हे अजगर पाईपच्या साहय्याने वरती गेले असण्याची शक्यता आहे,” असे सुनीश सुब्रमण्यम कुंजू (मानद वन्यजीव रक्षक आणि पाऊज-मुंबईचे संस्थापक) यांनी अवर्तन पवईला सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आरोग्य तपासणीसाठी अजगराला डॉ. राहुल मेश्राम यांच्याकडे नेण्यात आले आणि वनविभागाला कळवल्यानंतर, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात स्थलांतरित करण्यात आले आहे.”

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!