@अविनाश हजारे | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार विक्रोळी विभागांतर्गत झालेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. पवईतील आयआयटी मेनगेट येथील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये आमदार सुनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक १२२च्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शिवसेना पुरस्कृत अनेक मंडळे, संस्थांच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी समाजाप्रती असलेली आपली […]
