Tag Archives | ब्रेकिंग न्यूज

metro - 6 work at powai main

मेट्रो ६च्या १०८ डब्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने काढली निविदा; ९८९ कोटींचा खर्च

मेट्रो ६ ही लाईन पूर्णपणे उन्नत असून, वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडते. अंधेरीतील स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मेट्रो लाईन-६ मार्गावर धावणाऱ्या सहा डब्यांच्या मेट्रोचे डबे पुरविण्यासह त्यांची चाचणी करणे व मेट्रो चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. ३१ जुलै २०२३ ही निविदा भरण्याची […]

Continue Reading 0
hatya

कौटुंबिक वादातून मुलाचा वडिलांकडून खून

कौटुंबिक वादातून जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोलीस शिपाई असणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना १६ मार्चला पवई येथील गणेशनगर परिसरात घडली. हरिष गलांडे (४०) असे या मुलाचे नाव असून, घटनेनंतर पवई पोलिसांनी आरोपी वडील गुलाब गलांडे यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील चौकशीसाठी २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या […]

Continue Reading 0
pl led

पवई तलावाचा विकास सीईआरच्या माध्यमातून

पवई तलावाचा कायापालट ‘सांघिक पर्यावरणीय जबाबदारी’च्या (कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंटल रिस्पॉन्सिबिलीटी- सीईआर) माध्यमातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्तांच्या उपस्थित झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने पवई तलावाचा विकास, मुलुंड ते पवई भागात मियावाकी पद्धतीने वनीकरण,झोपडपट्टी सुधारणा, करोनाविषयी जनजागृतीसाठी चित्रफित, विद्यार्थ्यांना संगणक आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक शिक्षक आदी विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे. हे प्रकल्प […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

किरकोळ वादातून आयआयटी पवई येथे तरुणाचा खून

हातगाडी लावण्याच्या वादातून गोखलेनगर येथे एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार (१९ फेब्रुवारी) १२.३० वाजता पवईत घडला. चाकूने छातीत भोकसून अमोल सुराडकर (२५) या तरुणाचा खून करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी शिताफीने सचिन सिंग आणि जितेंद्र उर्फ प्राण या दोघांना पळून जाण्याच्या तयारीत असताना कुर्ला येथून अटक केली आहे. या संदर्भात […]

Continue Reading 0
eve-teasing-482x300

मराठी अभिनेत्रीच्या विनयभंग प्रकरणी तिघांविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

५ फेब्रुवारीला पुणे येथील रांजणगाव येथे कार्यक्रमात सादरीकरण करत असताना मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या एका अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नृत्य तारका म्हणून प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री चांदिवली येथील नहार कॉम्प्लेक्समध्ये राहते. अभिनेत्रीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ज्यानंतर या अभिनेत्रीने साकीनाका […]

Continue Reading 0
underground metro 6 camp

मेट्रो-६ भूमिगत करण्याच्या समर्थनात पवईत सह्यांची मोहीम

आज, रविवार (२ फेब्रुवारी) संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत चांदिवली डी-मार्टजवळ भूमिगत मेट्रो-६ समर्थनात सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे. पवईतील विविध भागात भूमिगत मेट्रो -६ च्या समर्थनात सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. आज रविवार (२ फेब्रुवारी) चांदिवली डी-मार्टजवळ आणि रहेजा विहार येथे ही मोहिम राबवली जाणार आहे. संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत भूमिगत मेट्रोच्या मागणीच्या […]

Continue Reading 0
metro - 6 work at powai main

मेट्रो – ६ भूमिगत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करावी: पवईकरांची मागणी

मुख्यमंत्र्यांनी आरे कार शेड प्रकरणात सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला असल्याने आम्हाला आशा आहे की ते आमच्या भूमिगत मेट्रोच्या मागणीकडे सुद्धा लक्ष देतील. – पवईकर @प्रमोद चव्हाण मेट्रो – ६ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी पवईकरांनी केली आहे. सोमवारी रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे भूमिगत मेट्रोच्या मागणी आणि भेटी संदर्भातले पत्र सादर केले. […]

Continue Reading 0
mumbaikarshuman chain on Powai lake for demanding underground metro

भूमिगत मेट्रोच्या मागणीसाठी मुंबईकरांची पवई तलावावर मानवी साखळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारद्वारे सुरू केलेल्या अनेक पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेत निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या अनेक प्रकल्पांना लाल झेंडा दाखवलेला असतानाच मुंबईकरांनी उपनगरामधील भूमिगत मेट्रो कॉरिडोरच्या आपल्या मागणीवर जोर दिला आहे. याच मागणीसाठी शनिवारी (०८ डिसेंबर) मुंबईकरांकडून पवई तलाव भागात मानवी साखळी तयार करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ४.३० ते ६.३० […]

Continue Reading 0
vruksh tod

मेट्रो – ६ घेणार ३४० झाडांचा जीव?

पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर मेट्रो – ६ प्रकल्पात कुऱ्हाड स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मार्गावर चालणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे. पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर या प्रकल्पासाठी […]

Continue Reading 0
The citizen delegation during the meeting with BMC officials

पवई तलावातील जलपर्णी काढण्यापासून पालिकेची चालढकल

पवई तलावाला हळूहळू नष्ट करणाऱ्या जलपर्णीना काढण्याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिका्यांनी नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. एका अधिकाऱ्याने प्रतिनिधीना सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे […]

Continue Reading 0
DSC09622

पवई तलावावर जलपर्णींचे साम्राज्य; सहा महिन्यांपासून स्वच्छता नाही

कंत्राटदाराची नेमणूक करणे बाकी असल्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असणाऱ्या पवई तलावाला सहा महिन्यांपासून साफ केले गेले नाही. जर लवकरात लवकर जलपर्णीना काढून टाकले नाही तर लवकरच तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापला जाईल अशी चिंता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईचे वैभव असणारा पवई तलाव दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची पाणी साठवण्याची क्षमता हळू हळू […]

Continue Reading 0
DSC09622

पवई तलावाची स्वच्छता जागतिकस्तरावर; भारतातील पहिलाच प्रयोग

परदेशातील नद्या, तलावे इतके स्वच्छ असतात की त्यांच्या सौंदर्याची कुणालाही भुरळ पडते. भारतातील नद्या आणि तलाव गटारगंगा झाल्या आहेत. जे पाहता मुंबई महानगर पालिकेने प्रदूषित मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच दासून इंटरनॅशनल या कॅनेडियन कंपनीसोबत एक करार करण्यात येणार आहे. पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिका कॅनडातील […]

Continue Reading 0
phishing

कंपनीचा सर्व्हर हॅक करून पूर्ववत करण्यासाठी बीटकॉईनची मागणी

साकीनाका पोलिसांच्या हद्दीत कार्यालय असणाऱ्या ड्रायफ्रूट कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातील सर्व्हर हॅक करून भामट्यांनी ऑनलाइन घुसखोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ही प्रणाली पूर्ववत करण्यासाठी या भामट्यांनी कंपनीकडे चक्क बिटकॉइनसची मागणी केली आहे. ऑनलाईन गुन्हेगारी हे सध्याच्या गुन्हेगारी जगतातील लोकांचे खूप मोठे हत्यार बनून राहिलेले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात वैयक्तिक […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!