पवई येथे प्रस्तावित असलेल्या ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ (GCC) आणि मोठ्या व्यावसायिक प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या नागरी समस्यांसंदर्भात ‘पवई ॲक्शन फोरम’च्या (PAF) शिष्टमंडळाने सोमवार, २८ सप्टेंबरला मुंबई महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त अश्विनी भिडे (भा.प्र.से.) यांची भेट घेतली. शिष्टमंडळात डॉ. रतन शारदा, रमेश रथ, विकास गुप्ता, शोभा फिलिप्स, वंदना दिवाण, अनिर्बान बॅनर्जी आणि जयमन खोना यांचा समावेश होता. […]

