Tag Archives | Chandivali
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: पवईचा श्री- नवदुर्गा मित्र मंडळ
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: नवसाचा राजा, गोखले नगर
पवई-चांदिवली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: चांदिवलीचा महाराजा
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: कला विकास मंडळ, तिरंदाज व्हिलेज, पवई
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: पवईचा इच्छापूर्ती
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: पवईचा राजा
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा: पवईचा महाराजा
दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]
पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. […]
संघर्षनगरच्या रस्त्यावरून भाजपा आक्रमक; विकासकाच्या कार्यालयावर हल्लाबोल
चांदिवली संघर्षनगर भागात विकासक, पालिका, स्थानिक प्रतिनिधी सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे अजूनही येथील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. याबाबत सतत पाठपुरावा करूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे शुक्रवारी स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विकासक सुमेर कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर हल्लाबोल करत धरणे दिले. बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या राहणाऱ्या हजारो परिवारांना दहा वर्षापूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजने […]
रहेजा विहार येथे इमारतीवरून उडी मारून वृध्देची आत्महत्या
चांदिवली, रहेजा विहार येथील मेपल लिफ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका ७२ वर्षीय वृध्देने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. लक्ष्मीबाई राऊत (७२) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धेचे नाव असून, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत आपल्या परिवारासोबत रहेजा विहार येथील […]
पवई, चांदिवली पाच तास थांबली
प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे, रमेश कांबळे “मुंबापुरी आणि मुंबईकर कितीही संकटे आली तरी कधीच थांबत नाहीत” असे म्हटले जाते. मात्र, मुंबईचा भाग असणारे पवई आणि चांदिवली आज जवळपास ५ तास वाहतूक कोंडीत थांबली. पवई आणि चांदिवली भागात सकाळी ९ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास पाच तास शाळेच्या […]
मार्केट सिग्नलजवळ मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवले; गंभीर जखमी
@अविनाश हजारे पवई गणेशनगर येथे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारसायकलने एका १९ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच, अशाच एका भरधाव मुजोर बाईकस्वाराने तरुणीला उडवल्याची घटना आयआयटी मार्केट येथे घडली आहे. वेगाची ही झिंग फुलेनगर येथे राहणाऱ्या हिना कनोजिया (२०) या तरुणीच्या जीवावर बेतता बेतता राहिली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी सकाळी ८ […]
चांदिवलीत सराफाला दहा लाखांचा गंडा
चांदिवली फार्मरोडवरील एका सराफाला १० लाख ४३ हजार रुपयांना एका ठगाने गंडवल्याची घटना घडली आहे. याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून, साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत. रमेश जैन यांचे चांदिवली फार्मरोड परिसरात दागिन्यांचे दुकान आहे. काही दिवसांपुर्वी दुकानामध्ये एक व्यक्ती दागिने पाहण्यासाठी आला होता. मी खूप दागिने खरेदी करणार असल्याचे सांगत […]
पवईकरांनी गिरवले योगाचे धडे
योग हा ५००० वर्षांपूर्वीचा भारतात जन्मलेला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक आभ्यास आहे. शरीर आणि मन दोन्ही निरोगी, तणावमुक्त राखणाचे काम योग करतो. ११ डिसेंबर २०१४ मध्ये युनायटेड नेशन्स महासभेने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केले. ज्यानंतर संपूर्ण जगभर २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून पवईमध्ये सुद्धा या […]
पवईकरांच्या साथीने प्राणी मित्रांनी वाचवले घार, कोब्रा व धामणीचे प्राण
@सुषमा चव्हाण पाठीमागील आठवड्यात चांदिवली म्हाडा कॉलनी येथे उष्माघाताने जखमी पडलेली घार आणि पवई विसर्जन घाटावर विसाव्याच्या शोधात रस्त्यांवर आलेल्या कोब्रा व धामणीचे प्राण पवईकरांच्या मदतीने प्राणी मित्रांनी वाचवले. अम्मा केअर फाऊंडेशन (ACF) आणि प्राणी मित्र संघटना पॉज मुंबई (PAWS) यांनी बचाव करून निसर्गाच्या सानिध्यात त्यांना परत सोडले आहे. चांदिवली म्हाडा कॉलनी येथील रहिवासी राहूल […]
पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत
३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]
चांदिवलीत बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मजूरांची सुखरुप सुटका
@प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे चांदिवली येथील हिरानंदानी विकासकाच्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली आहे. अग्निशमन दलाच्या २० – २५ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीतून ७० – ८० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, धूर शरीरात गेल्याने श्वसनास त्रास जाणवू लागलेल्या ६ कामगारांना […]
विकासकाला २० कोटीची खंडणी मागणाऱ्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
पवईतील एका नामांकित विकासकाला २० करोडची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे (४५) आणि त्याचा गाडी चालक विठ्ठल फालके (४२) याला न्यायालयाने आज (गुरुवार) दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी पवई पोलिसांनी त्यांना मुलूंड येथील हॉटेलमधून खंडणीचा १ करोड रुपयाचा हप्ता स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. विकासक यांच्याकडे २७ वर्ष नोकरी करणारा पाखरे २०१६ […]

