पवई तलावा लगत उभारण्यात येत असलेल्या सायकल मार्गिकेच्या बांधकामाला उच्च न्यायालयात देण्यात आलेल्या आव्हानाचा निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. पवई तलावा लगत उभारण्यात येत असलेल्या सायकल मार्गिकेच्या बांधकामाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. या निर्णयावर पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहणार की जाणार हे अवलंबून असणार […]
Tag Archives | cycle track
लोकसभेत सायकल ट्रॅकचा मुद्दा उपस्थित; प्रकल्प बंद करण्याची खासदार मनोज कोटक यांची मागणी
७ डिसेंबर रोजी पवई तलावावरील सायकल ट्रॅक प्रकल्पाचा मुद्दा भाजप खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत उपस्थित केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे पवई तलावातील जैवविविधतेला धोका असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर थांबवावा अशी मागणी कोटक यांनी केली. पर्यावरण तज्ज्ञांच्या समितीने यापूर्वी सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे सर्वेक्षण करून हे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली होती. […]
पवई तलावाजवळील सायकल ट्रॅकला ३१ जानेवारीपर्यंत हायकोर्टाची स्थगिती
मुंबई महापालिकेचा पूर्व उपनगरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या पवई तलावाजवळ बनवण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या कामाला दिलेली स्थगिती हायकोर्टाने ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता बारगळल्याची चर्चा आहे. या प्रकल्पाविरोधात आयआयटी पवईतील दोन विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्यावर मंगळवारी सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी आणखीन वेळ […]
पवई तलावाचे सौंदर्य संपवून सायकल ट्रॅक नको; पवई तलावातून सायकल ट्रॅक बांधकामाला निसर्गप्रेमींचा विरोध
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सायकल ट्रॅक बनवण्यासाठी पवई तलावात दगड आणि गाळ टाकणे पुन्हा सुरू करताच शनिवारी अनेक निसर्गप्रेमींनी शनिवारी गांधीगिरीच्या मार्गाने तर रविवारी परिसरातील प्रस्तावित सायकल ट्रॅकच्या विरोधात पवई तलावाजवळ जमा होत विरोध प्रदर्शन केले. यावेळी पवईकरांसह मुंबईच्या विविध भागातील रहिवाशांनीही सायकल ट्रॅकचे पुढील बांधकाम थांबवण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन करण्यासाठी निदर्शनात भाग घेतला. ‘पवई तलाव वाचवा’, […]
आदित्य ठाकरे यांच्यातर्फे पवई तलाव परिसरातील सायकल, जॉगिंग ट्रॅकच्या कामाची पाहणी
पवई तलाव परिसरात तयार करण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बरोबरच सौंदर्यकरण कामाचा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी पाहणी केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या पर्यटनस्थळापैकी एक महत्वाचे ठिकाण असणाऱ्या पवई तलाव […]