आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पवई तलाव येथे होणाऱ्या गणपती विसर्जन सोहळ्याची पूर्वतयारी व नियोजन करण्यासाठी एका विशेष संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक चांदिवली विधानसभेचे शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली एस विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती समरीन शबाना सलीम सय्यद यांच्या दालनात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस महापालिकेचे अधिकारी आणि पवई पोलिस […]



